रोहित पवारांच्या विधानसभा उमेदवारीचा पेच वाढला

रोहित पवारांनी मागणी केलेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यात कर्जत-जामखेडसाठी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी साळुंखे यांनी उमेदवारी मागितली आहे.

रोहित पवारांच्या विधानसभा उमेदवारीचा पेच वाढला
(फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Jul 30, 2019 | 10:31 AM

अहमदनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवार कुटुंबीयांची तिसरी पिढी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यात तिसऱ्या पिढीतील एक म्हणजे पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे रोहित पवार. पार्थ पवारांनी लोकसभेत आपलं नशीब आजमावलं, मात्र, संपूर्ण ताकद लावूनही त्यांचा दारुण पराभव झाला. तर येत्या विधानसभेला रोहित पवार रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी पक्षाकडे रितसर अर्ज करुन कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणीही केली. मात्र त्यांची ही उमेदवारी धोक्यात आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी देखील आघाडीचा निर्णय घेतला आहे. मात्र जागावाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होत असल्याचे दिसत आहे. रोहित पवारांनी मागणी केलेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यातच नगरमध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यात कर्जत-जामखेडसाठी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी साळुंखे यांनी उमेदवारी मागितली आहे.

तर दुसरीकडे स्थानिक उमेदवार असताना आयात उमेदवारांना संधी देऊ नका असा इशारा  स्थानिकांनी दिला आहे. इतकंच नव्हे तर स्थानिक उमेदवार सक्षम असताना बाहेरचे उमेदवार लादण्यात येऊ नये असं मतही स्थानिकांनी व्यक्त केलंय. त्यामुळे रोहित पवार उमेदवारी धोक्यात आली आहे.

नुकंतच अहमदनगरला काँगेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यात नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 40 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सध्या नगर जिल्ह्यात काँग्रेसचे 3 आमदार आहेत. त्यापैकी विखे यांनी काँगेसला राम राम केल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. तर काँग्रेसने 6 जागांवर आपला दावा केला आहे.

विशेष म्हणजे कर्जत-जामखेड मधून रोहित पवार इच्छुक असतानाही काँग्रेसने त्या जागेवर दावा केला आहे. तर नगर आणि श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असताना काँगेसने उमेदवारीची मागणी केली आहे.

इतकंच नव्हे तर जामखेडची जागा यापूर्वी काँग्रेसनेच लढवली होती. त्यामुळे आम्ही ही जागा सोडणार नाही. ही जागा यापुढेही काँग्रेसच लढवेल, असं ठाम मत काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केलं होत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी देखील उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे आता या सर्व पेचातून रोहित पवार कसा मार्ग काढतात, त्यांना उमेदवारी मिळणार का  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या : 

रोहित पवारांची विधानसभा उमेदवारी धोक्यात

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.