आमच्यासारख्या कार्यकर्त्याने तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा ? रोहित पवारांचे सुनील तटकरेंवर टीकास्त्र

शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटासोबत गेलेल्या एकेका नेत्यावर रोहित पवार हे ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधत आहेत. त्यांनी ट्विटरवरून सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

आमच्यासारख्या कार्यकर्त्याने तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा ? रोहित पवारांचे सुनील तटकरेंवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 11:54 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आणि राजकीय चर्चांना उधाण आलं. अजित पवारांसह (ajit pawar) अनेक ज्येष्ठ नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार त्यांच्यासोबत ३० आमदार घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यापैकी ९ आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतील नेते संतापले असून आमदार रोहित पवार (rohit pawar) हे सातत्याने या नेत्यांवर टीका करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे ट्विटरच्या माध्यमातून बंडखोरांवर निशाणा साधताना दिसत आहेत. आज सकाळी (7 जुलै) त्यांनी बंडखोर नेते सुनील तटकरे (Sunil tatkare) यांना लक्ष्य करत त्यांच्यावर कडाडून टीका केली.

काय आहे रोहित पवारांच ट्विट ?

ट्विटरमधील या पोस्टमध्ये रोहित पवारांनी सुनील तटकरेंच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख त्यांना मिळालेल्या पदांची यादीच जाहीर केली आहे. तुम्हाला काय कमी केलं होतं ? असा सवालही त्यांनी तटकरेंना विचारला आहे. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण…..? अशी बोचरी टीका रोहित पवारांनी केली.

‘ पक्ष संघटनेत आणि सत्तेतील असं एकही पद नाही जे तुम्हाला मिळालं नाही. तरीही अजून काय द्यायला पाहिजे होतं ? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगड जिल्ह्याचं आपण प्रतिनिधित्त्व करत आहात. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण…..?’

‘मा. तटकरे साहेब, रायगड जिल्हा नेहमीच आपल्या अधिपत्याखाली राहील याची काळजी मा. पवार साहेबांनी घेतली. आमदराकी, खासदारकी, मंत्री अशी सर्वच पदं आपल्या एकट्याच्याच घरात दिली. अध्यक्षपदाची जबाबदारीही आपल्यावर सोपवली होती. पण ज्यांनी हे पद सांभाळलं, त्यानेच इतरांच्या दावणीला हा पक्ष का बांधावा ? असा प्रश्नही आपल्याला कसा पडला नाही ? आमच्यासारख्या कार्यकर्त्याने तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा ? ‘ अशा शब्दांत रोहित पवारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी ? असा सवालही त्यांनी तटकरेंना विचारला आहे.

यापूर्वी गुरूवारी रोहित पवार यांनी दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांनाही सवाल विचारत त्यांच्यावर टीका केली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.