Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या काळातच मराठा, धनगर मोर्चे निघाले, प्रश्न मार्गी का लावले नाही?; शशिकांत शिंदेंचा सवाल

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजप नेते, खासदार उदयनराजे भोसलेंवर टीका केली आहे. (row over maratha reservation, shashikant shinde slams udayanraje bhosale)

फडणवीसांच्या काळातच मराठा, धनगर मोर्चे निघाले, प्रश्न मार्गी का लावले नाही?; शशिकांत शिंदेंचा सवाल
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 3:49 PM

सातारा: मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजप नेते, खासदार उदयनराजे भोसलेंवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते. तेव्हा फडणवीसांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाही?, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला आहे. (row over maratha reservation, shashikant shinde slams udayanraje bhosale)

मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याची हमी मी देतो, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. त्यावर शशिकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळीच मराठा आणि धनगर समाजाचे मोर्चे निघाले होते. फडणवीस यांनी तर धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मग हे विषय त्यांनी मार्गी का लावले नाहीत. पाच वर्षाच्या सत्ताकाळात फडणवीस यांनी किती न्याय देण्याचा प्रयत्न केला? असा सवाल शिंदे यांनी केला.

भाजपच्या काळात मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेले वकीलच आताही ही केस लढवत आहेत. पण तरीही जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असून भाजप देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहे. सरकारचाही तोच प्रयत्न आहे. अशावेळी मराठा आरक्षणात राजकारण न करता एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं सांगातनाच उदयनराजेंना मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, त्याचं काय झालं?, असा सवालही त्यांनी केला.

आरक्षण देणं पवारांच्या हातात नाही

मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. आरक्षण देणं हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात नाही, असा उदयनराजेंना टोला लगावतानाच केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असंही ते म्हणाले. (row over maratha reservation, shashikant shinde slams udayanraje bhosale)

संबंधित बातम्या:

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

सरकार नसतं तर जयतं पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार, तारीख ठरली

(row over maratha reservation, shashikant shinde slams udayanraje bhosale)

'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी.
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा.
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ.
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले.
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड.
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.