Video| रोहिणी खडसेंच्या वाहनावरील भ्याड हल्ल्याचा निषेध, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी, रुपाली चाकणकरांची मागणी

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. अशा भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

Video| रोहिणी खडसेंच्या वाहनावरील भ्याड हल्ल्याचा निषेध, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी, रुपाली चाकणकरांची मागणी
रुपाली चाकणकर
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 11:33 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची  किरकोळ तोडफोड झाली असून, रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या हल्ल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गंभीर दखल घेली आहे. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी चाकणकर यांनी केली.

काय म्हणाल्या चाकणकर? 

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यामधून खडसे सुखरूप बचावल्या आहेत. वाहनाचे नुकसान झाले. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते. हल्ला करणारे कोणीही असे सुटता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करून, त्यांना अटक करावे अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

काय आहे नेमकी घटना ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला.  रात्रीच्या अंधारात हा हल्ला कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराने पळ काढल्यामुळे त्याला पकडण्यात यश आलेले नाही. मात्र शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यातील वाद ताजा असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या 

Maharashtra Assembly Speaker Election: महाविकास आघाडीपाठोपाठ भाजपचा आमदारांना व्हीप; विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार?

Video: कठीण आहे काँग्रेसचं? स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा खाली पडला, सोनिया गांधीही बघत राहिल्या

Maharashtra Assembly: शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री येणार का? राऊत म्हणतात, मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून नियंत्रण !

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.