“याकूब कबर प्रकरणी आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतो, पण…”, सामनातून भाजपवर पलटवार

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून याकूब कबर प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्यात आलं आहेत. तसंच (उप)मुख्यमंत्री म्हणत सामनातून फडणवीसांना छेडण्यात आलंय.

याकूब कबर प्रकरणी आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतो, पण..., सामनातून भाजपवर पलटवार
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 8:57 AM

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) याकूब मेमन कबर प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्यात आलं आहेत. त्यांना आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतो, असंही म्हणण्यात आलंय. तसंच (उप)मुख्यमंत्री म्हणत सामनातून फडणवीसांना छेडण्यात आलंय. “याकूब कबरीच्या प्रकरणात आम्हीही फडणवीसांना (Devendra Fadnavis) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शंभर प्रश्नांचा भडीमार करू शकतो, पण राजकारण इतक्या खालच्या स्तरावर निदान आम्ही नेऊ इच्छित नाही. मुंबई दंगलीचा आणि बॉम्बस्फोटांचा सर्वात मोठा घाव शिवसेनेवरच बसला. तेव्हा हे आजचे ‘कुळे-बुळे’ हिंदुत्ववादी कोणत्या बिळांत लपून बसले होते हे महाराष्ट्र जाणतो. आज याकूब याकूब म्हणून छाती पिटणारे तेव्हा कोणत्याच लढाईत नव्हते. शिवसेनाच सगळ्यांची रक्षणकर्ती म्हणून पुढे होती”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीची चौकशी करण्याची घोषणा (उप)मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. होऊनच जाऊ द्या! आम्ही त्या चौकशीचे स्वागतच करीत आहोत, असं म्हणत सामनातून फडणवीसांना चिमटा काढण्यात आला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटांतील फाशी दिलेला आरोपी याकूब मेमन याच्या कबरीतील परिसरात दिवे लावले. ती कबर संगमरवरी दगडाने सजवली व त्याचे खापर भाजपमधील कुळ्यांनी आणि बुळ्यांनी शिवसेनेवर फोडले. सध्या महाराष्ट्रातील सर्व जीवनावश्यक विषय जणू संपले आहेत. त्यामुळेच भाजपने याकूब मेमनची कबर खणण्याचे कार्य हाती घेतले आहे, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

संसदेवरील हल्ल्यांचा सूत्रधार अफझल गुरू याला फासावर लटकवले व तिहार कारागृहाच्या आवारातच दफन केले. कश्मीरात तेव्हा तणाव निर्माण झाला. याकूब मेमनच्या बाबतीत हे सर्व सोपस्कार नागपुरातच करता आले असते. म्हणजे पुढचे कबरीचे प्रकरण घडलेच नसते, पण तेव्हा मुख्यमंत्री होते आपलेच देवेंद्रजी. त्यांनी उदार अंतःकरणाने एका दिलदारीने याकूबचा मृतदेह मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना सोपवला, असं म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थि करण्यात आलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.