Saamana : सामनाकडून दिपाली सय्यद इग्नोर, मात्र “वासू-सपनाचा संसार, खुर्चीचा प्रेमरोग” म्हणत शिंदे-फडणवीसांवर तुफान फटकेबाजी

सामनातून आज पुन्हा शिंदे आणि फडणवीसांवर तुफान फटकेबाजी करण्यात आली आहे. त्याला वासू-सपनाचा संसार, एक दुजे के लिए, खुर्चीचा प्रेम रोग, अशी अनेक नावं देण्यात आलेली आहेत.

Saamana : सामनाकडून दिपाली सय्यद इग्नोर, मात्र वासू-सपनाचा संसार, खुर्चीचा प्रेमरोग म्हणत शिंदे-फडणवीसांवर तुफान फटकेबाजी
खा. संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 6:50 AM

मुंबई : राज्यात कॅबिनेटच्या (Cabinet Expansion) विस्तारावरून सुरू झालेली तुफान फटकेबाजी अजूनही थांबायचं नाव येत नाहीये. कालच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी ठाकरे आणि शिंदे यांच्यात दोन दिवसात चर्चा होणार असल्याचा अदाज वर्तवला. तसेच ही शिवसैनिकांची इच्छा असल्याचेही बोलून दाखवले, मात्र शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने (Saamna) दिपाली सय्यद यांना थेट इग्नोर मारलंय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण या चर्चेच्या चर्चेवर एकही बातमी सामनातून दिसून आलेली नाही. तसेच सामनातून आज पुन्हा शिंदे आणि फडणवीसांवर तुफान फटकेबाजी करण्यात आली आहे. त्याला वासू-सपनाचा संसार, एक दुजे के लिए, खुर्चीचा प्रेम रोग, अशी अनेक नावं देण्यात आलेली आहेत. त्यावरही आता तीव्र् प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

सामनातून नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्रात सध्या अस फडणवीस शिंदे हे दोघांचेच सरकार व दोघांचेच मंत्रिमंडळ हा एक अनोखा प्रयोग म्हणायला हरकत नाही. राजकीय व नियोजन मृणायचे ते हेच, पण सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू-सपना सरकारवर ही वेळ ओढवली आहे. पंगत मांडलीय, मांडव सवलाय, पण बँडबाजा-बरात रस्त्यात अडकलीय. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर करण्यावर रोक लावणे, ठाकरे सरकारचे लोककल्याणकारी निर्णय थांबवणे, आरचे जंगल नष्ट करणे असले प्रकार केले जात आहेत. या ‘प्रेमरोगा’ वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय हावये ते होईल पण महाराष्ट्राच्या बाबतीत देदेवाकडे घडवू पाहणार असतील तर ते सहन करता येणार नाही. महाराष्ट्रावर धोक्याची गिधाडे फडफडत आहेत, पण महाराष्ट्र नाउमेद होणार नाही, लढत राहील। अशी कडकडीत टीका सामनातून करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ कुठे आहे?

हे टीका प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर  “त्यांचे नाते उगे आहे. त्यांची ‘आशिकी’ सत्तेची आहे. त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आहे. खुर्चीलाच ‘अनारकली’ मानून त्यांच्या प्रेमाचे जप-बाप सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ही नवी ‘लव्हस्टोरी-२२’ उदयास आली आहे. ते दोघे बीजवर आहेत, त्यातील एका गटाने पर शिवसेनेच्या नावाने आणाभाका घेऊन बांधलेले मंगळसूत्र ताड़कन तोडले, पण तरीही शिवसेनेशिवाय त्यांचा दिवस आगत नाही की मावळत नाही, बासू सपनाच्या नव्या प्रेमकहाणीतला हा एक भाग आहे. या अद्यापि मंत्रिमंडळाचे हाड जमवता आलेले नाही. मंत्रिमंडळरूपी क्हाड कोठे? प्रश्नच आहे.” असाही सवाल सामनातून करण्यात आलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.