Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्यात वैचारिक मतभेद, पण भाजपचं लोकशाहीवरील गंडांतर दूर होईपर्यंत आम्ही एकत्र : काँग्रेस

शिवसेना आणि आम्ही आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, असं वाटत असेल तर साहजिक आहे,असं सचिन सावंत म्हणाले आहेत.(Congress Spoke person Sachin Sawant said we have ideological differences with Shivsena but we will united till bjp is dangerous to democracy)

आमच्यात वैचारिक मतभेद, पण भाजपचं लोकशाहीवरील गंडांतर दूर होईपर्यंत आम्ही एकत्र : काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 8:01 PM

पुणे :  महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना आणि आम्ही आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत, असं म्हटलं आहे. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, असं वाटत असेल तर साहजिक आहे. सर्वजण आपली ताकद वाढवावी यासाठी प्रयत्न करणार त्यामध्ये काही गैर नाही,असं सचिन सावंत म्हणाले. भाजपचे लोकशाहीवर जे गंडांतर आलेलं आहे, ते दूर होत नाही पर्यंत आम्ही एकत्रितपणे राहणार आहोत. तीन पक्ष मिळून एकत्रितपणे सरकार चालवू त्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केलाय, त्यावर पूर्ण पाच वर्षे हे सरकार चालेल, असा विश्वास सचिन सावंत यांनी व्यक्त केला. (Congress Spoke person Sachin Sawant said we have ideological differences with Shivsena but we will united till BJP is dangerous to democracy)

सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणावर मोदी सरकारची भूमिका काय?, असा प्रश्न उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत मोदी सरकार अनुकूल नाही. त्यामुळे भाजपचे राज्यातील नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक महाविकास आघाडीबाबत अपप्रचार केला जात आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. भाजपच्या नेत्यांनी मराठा आरक्षणावरुन आग लावण्याचे, लोकांना फितवण्याचे धंदे बंद करावेत, ही विनंती करतो, असंही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या विषयावर जी न्यायालयीन लढाई सुरु आहे, त्यावर राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीकडून हा लढा लढला जातोय, याची पोटदुखी भाजपला आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाचा लढा देत आहे. त्यामुळे भाजपकडून महाविकास आघाडीची बदनामी केली जाती आहे. आम्ही याचा निषेध करतो, सचिन सावंत म्हणाले. मराठा आरक्षणाला देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आम्ही सर्वांनी एकमताने पाठींबा दिला होता. फडणवीस सरकारने आम्हाला त्यावेळी विश्वासात घेतले नव्हतं, अशी टीका सावंत यांनी केली.

भाजपमधील मराठा नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मराठा आरक्षणासंदर्भात भाजपमध्ये जे मराठा समाजातले नेते आहेत त्यांच्यातच एकमत नाही. मात्र, भाजपमधील मराठा समाजातील नेत्यांचं लोकांची दिशाभूल करण्यात एकमत आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे.मात्र, भाजपच्या नेत्यांमध्ये संधीसाधूपणाची स्पष्टता आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, पंतप्रधानांनी अजून वेळ दिली नाही हे दुर्दैव आहे, असं सचिन सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या :

मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही- सचिन सावंत

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?

(Congress Spoke person Sachin Sawant said we have ideological differences with Shivsena but we will united till BJP is dangerous to democracy)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.