तालिबानी वृत्तीने वागाल तर शेतकरी शांत बसणार नाही, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा

बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून राज्य सरकारमधील नेते आणि प्रशासन कामाला लागलंय. अशावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. शेतकरी आपले बैल आणून न्याय मागणार असतील आणि हे तालिबानी वृत्तीने वागत असतील तर शेतकरी शांत बसणार नाही, तो आंदोलन करेल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय.

तालिबानी वृत्तीने वागाल तर शेतकरी शांत बसणार नाही, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा
सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 3:21 PM

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. मात्र, त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ही बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून राज्य सरकारमधील नेते आणि प्रशासन कामाला लागलंय. अशावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. शेतकरी आपले बैल आणून न्याय मागणार असतील आणि हे तालिबानी वृत्तीने वागत असतील तर शेतकरी शांत बसणार नाही, तो आंदोलन करेल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय. (Sadabhau Khot criticizes Mahavikas Aghadi government)

20 ऑगस्ट रोजी गोपीचंद पडळकर यांनी झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंचक्रोशीतील गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. झरे गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. असं असलं तरी 20 ऑगस्टला सरकारनं कितीही ताकद लावली तरी शेतकरी येतील. जे काही अनुचित होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल. आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मैदानात उतरु, संघर्ष करु, असा पवित्रा आता सदाभाऊ खोत यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

‘..तर खिलारी बैल नामशेष होतील’

बैलगाडा शर्यतीची परंपरा 400 वर्षे जुनी आहे. याबाबत 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानं बंदी आणली. त्यांनी सांगितलं की राज्यांनी कायदा करावा. राज्य सरकारने 2017 ला याला परवानगी देण्याचा कायदा झाला. त्याचा अहवाल आला. कर्नाटक, तामिळनाडू सरकारने कायदा करुन शर्यती सुरु केल्या. महाविकास आघाडी सरकारकडून न्यायालयात बाजू मांडली गेली नाही. महाराष्ट्रात देशी गायींचं संगोपन धोक्यात आलं आहे. खिलारी जात ही धावण्यासाठी असते. शर्यत बंद राहिली तर बैलांची ही जात नामशेष होईल, असं मतही खोत यांनी यावेळी व्यक्त केलं.

आटपाडी तालुक्यातील 9 गावांमध्ये संचारबंदी

आटपाडी तालुक्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून 20 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ही संचारबंदी लागू असणार आहे.

आमदार गोपीचंद पडळकर कोर्टाची बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नियमबाह्य शर्यतीचे आयोजक, संयोजक, स्पर्धक, बघ्यांवरही गुन्हे दाखल करणार, असे स्पष्ट करत कोणत्याही स्थितीत बैलगाडी शर्यती होवू देणार नाही, असा पवित्रा पोलीस व महसूल प्रशसानाने घेतलाय. प्रांताधिकारी संतोष भोर, डीवायएसपी अश्विनी शेंडगे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी झरे येथील बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगाने बैठक घेत त्या टाळण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनाही बैठकीला निमंत्रीत करण्यात आले होते. आमदार पडळकरांचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते.

बैलगाडा शर्यत टाळण्यासाठी पोलिसांकडून धरपकड

सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आलीय. तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. इतकंच नाही तर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना पोलीस विभागाकडून नोटीसा देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

बैलगाडा शर्यत आयोजित करणे अंगलट, अहमदनगरमध्ये 47 जणांवर गुन्हा, 6 जण ताब्यात

बंदी असताना बैलगाडा शर्यतीचं आयोजन, गोपीचंद पडळकरांकडून बक्षिसांची खैरात, ठाकरे सरकार कारवाई करणार ?

Sadabhau Khot criticizes Mahavikas Aghadi government

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.