“आजोबा म्हणाले, दौरे टाळा, तरीही नातू चिपळूण दौऱ्यावर; आजोबांचा सल्ला फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?”

पवारांच्या आवाहनानंतरी त्यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चिपळूणच्या दौऱ्यावर गेले. मग आजोबांचा सल्ला नातवाला मान्य नाही का? असा खोचक सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

आजोबा म्हणाले, दौरे टाळा, तरीही नातू चिपळूण दौऱ्यावर; आजोबांचा सल्ला फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?
शरद पवार आणि रोहित पवार
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 12:51 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं होतं. आजोबांच्या आवाहनानंतरी त्यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चिपळूणच्या दौऱ्यावर गेले. मग आजोबांचा सल्ला नातवाला मान्य नाही का? की हे सल्ले फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच होते, असा खोचक सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी विचारला आहे.

नेमकं काय म्हणालेत सदाभाऊ खोत?

पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नेमका हाच धागा पकडत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बोचरा सवाल उपस्थित केला.

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं….. आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही… कर्जत-जामखेडचे आमदार चीपळूणच्या दौऱ्यावर…. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा बोचरा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.

शरद पवार यांचं आवाहन काय?

राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. पवारांच्या आवाहनानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

रोहित पवार कोकण दौऱ्यावर

कोकणात अतिवृष्टीमुळं आणि दरडी कोसळून झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे… या संकटात उध्वस्त झालेले संसार नव्याने उभे करावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांना मदतीचं आवाहन केलं.

(Sadabhau khot taunt Rohit Pawar over Sharad Pawar Appeal)

हे ही वाचा :

ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा; शरद पवारांचं आवाहन

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.