Video | ‘ कामगारांना बांबू लावणार असाल तर आम्ही तुम्हाला बांबू लावू’ सदाभाऊ खोत यांचा घणाघात

तुम्ही जर कामगारांना बाबू लावणार असाल, तर आम्ही तुम्हाला बांबू लावू, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी इशारा दिलाय. एसटीचं विलीनीकरण का शक्य नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

Video | ' कामगारांना बांबू लावणार असाल तर आम्ही तुम्हाला बांबू लावू' सदाभाऊ खोत यांचा घणाघात
सदाभाऊ खोत यांचा अनिल परब यांना इशाराImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 3:10 PM

मुंबई : सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एसटी कामगारांच्या (St Employee strike) मागण्या मान्य केल्या जाव्यात याच्या समर्थनात निदर्शनं केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महविकास आघाडी सरकारसह परिवहन मंत्री सदाभाऊ थोक यांना थेट इशारा दिला आहे. तुम्ही जर कामगारांना बाबू लावणार असाल, तर आम्ही तुम्हाला बांबू लावू, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी इशारा दिलाय. एसटीचं विलीनीकरण का शक्य नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. विधानसभेत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटीचं विलीनीकरण शक्य नसल्याचं म्हटलं होत. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेता येणं अशक्य असलाचं त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर एसटी कर्मचारी आणि आंदोलक पुन्हा एकदा पेटून उठले आहेत. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना बगल देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

काय म्हणाले सदाभाऊ?

टीव्ही 9 मराठीसोबत बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी अनिल परबांवर टीका केली. तसंच सरकारकडून पोलिसांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही यावेळी सदाभाऊं केला आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय की, ….

आमचं भांडण पोलिसांसोबत नाही आहे. पण सरकार पोलिसांचा गैरवापर करतंय. सरकारनं संवादातून प्रश्न सोडवावा. अनिल परबसाहेब आणि मंत्रिमंडळ यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे. एसटी कामगारांचा संप मोडायचा ही त्यांची भूमिका आहे. एका बाजूला गोड बोलून कामगारांना कामावर घ्यायचं. मग कामगारांच्या चौकशा करुन त्यांच्यावर कारवाई करायची. त्याचे इन्क्रीमेन्ट थांबवायचे.

इतकंच काय तर एसटीचं खासगीकरण करण्याचा घाट सरकारनं घातलाय, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. एसटीचं खासगीकरण करुन सरकारनं फक्त हप्ते वसूल करायचे आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी सदाभाऊ खोत यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की,…

सरकारला एसटीचं खासगीकरण करायचं. एसटीच्या जागा यांना ढापायच्यात. खासगीकरण झालं की खासगी गाड्या येतील. मग हप्ते सुरु होतील. मराठी माणूस जगला पाहिजे, त्याची रोजीरोटी राहिली पाहिजे, याच्याशी यांना काहीही देणंघेणं नाहीये. यांना फक्त पैशांशी देणंघेणं आहे. यांनी पैशे मोजायची मशिन घेतली आहे. चार महिन्यांपासून एसटी बंद आहे. लालपरी हे महाराष्ट्राचं वैभव आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एसटीनं प्रवास करतात. सुप्रिया सुळे आणि पवार साहेब यांना युक्रेनच्या विद्यार्थ्यांची चिंता लागली आहे. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची चिंता तुम्हाला का नाही? तिकडं विमान सोडा म्हणता, पण अहो इकडं एसटी सुरु करा ना!

आता आम्ही अनिल परबांच्या बंगल्यासमोर आंदोलनाला बसू. सरकारनं दुष्टपद्धतीन वागून चालणार नाही..गोपनीयतेचं पत्र का काढता? पुन्हा बांबू घालायचाय म्हणून..! आता जर कामगारांना बांबू लावणार असाल, तर आम्ही तुम्हाला बांबू लावू.. एसटीत काम करणारी माणसं आमची शेता बांधावरची माणसं आहेत, खेड्यापाड्यावरची माणसं आहेत, यांची माती आम्ही होऊन देणार नाही.

पाहा सदाभाऊ खोतनेमकं काय म्हणाले?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.