मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार, 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, संभाजी छत्रपतींकडून घोषणा
मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती पुन्हा आक्रमक होत आहेत.
मुंबई : राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. मी एकटा आमरण उपोषण करणार आहे. मराठा समाजाला गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करतोय,असं संभाजी छत्रपती म्हणाले. शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) 18 पगड जाती, बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना 50 टक्के आरक्षण दिलं. त्यामध्ये अनूसूचित जाती, अनूसूचित जाती, ओबीसी आणि मराठा समाज यांचा समावेश होता. 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यावेळी मराठा समाज हा बहुजन समाजाचा भाग आहे. मराठा समाज आणि बारा बलुतेदारांना एकत्र कसं आणता येईल, यासाठी प्रयत्न केला. 5 मे 2021 ला मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं. त्यानंतर आंदोलनं केली. मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, आक्रमक आंदोलन केली. मात्र, आता उद्विग्न झालोय. माझा कोणत्याही पक्षातील नेत्यांना विरोध नाही. ज्यावेळी आरक्षण रद्द झालं त्यावेळी सगळ्या घटकांना एकत्र घेऊन आपलं आरक्षण रद्द कसं झालं यासंदर्भात राजकीय नेत्यांसमोर भूमिका माडंली.
मराठा समाजाला मागास सिद्ध करावं लागेल
मराठा समाजातील लोकांना आणि महाराष्ट्रातील लोकांना सांगत आलोय की वेळोवेळी भूमिका मांडत आलोय. पूनर्विचार याचिका करा पण वेळ गेला नंतर ती याचिका फेटाळली गेली. यानंतर भोसले समिती स्थापन करण्यात आली. मराठा समाज जोपर्यंत सामाजिक मागासलेपणा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला पुढारलेला समाज म्हटलं गेलं.
मराठा समाज मागास सिद्ध झाला तर काय
केंद्र सरकारनं काय सांगितलं तर राज्यांना आरक्षण द्या म्हणून पण सध्या 52 टक्के आरक्षण आहे. मग, 50 टक्के मध्ये आरक्षण कसं देणार आहे. मग, इंद्रा सहाणीच्या निकालानुसार अपवादात्मक स्थिती निर्माण झाल्यास आरक्षण द्यावं. मी सत्ताधारी पक्षाला राज्यसभेत बोलायची विनंती केली. मात्र, मला बोलू दिलं नाही. मग, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हस्तक्षेप केला. केंद्र सरकारनं सरसकट सामाजिक मागास आहेत, जाट, गुर्जर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
पाहा व्हिडीओ:
मी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. माझी मागणी हिच आहे की आम्हाला टिकणार आरक्षण द्यावं. 5 मे 2021 ला ज्यावेळी आरक्षण रद्द झालं तेव्हा सगळ्यांच्या दारी गेलो आणि हात जोडून मार्ग काढण्याची विनंती केली. महाराष्ट्र सरकारच्या हातात जे आहे त्या गोष्टी करण्याची विनंती केली. कोल्हापूरच्या आंदोलनानंतर मिटींग बोलावली आणि त्यामध्ये पाच ते सात मागण्यापूर्ण करण्याची विनंती केली. मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रश्नांसाठी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.
इतर बातम्या:
CTET Result : सीटीईटी परीक्षा निकालाची प्रतीक्षा संपणार? सीबीएसईकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता