Sambhajiraje Chhatrapati : ‘संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो’, संभाजीराजे समर्थकांकडून व्हिडीओ व्हायरल, इशारा नेमका कुणाला?

संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या समर्थकांकडून संभाजीराजेंचा एक व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला जातोय. या व्हिडीओच्या माध्यमातून राजकीय पक्षांना थेट इशारा देण्यात आलाय.

Sambhajiraje Chhatrapati : 'संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो', संभाजीराजे समर्थकांकडून व्हिडीओ व्हायरल, इशारा नेमका कुणाला?
संभाजीराजे छत्रपतीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 9:21 PM

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) सहा जागांपैकी सहावी जागा अपक्ष लढवणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी जाहीर केलं होतं. त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्याचं आवाहनंही केलं. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे संभाजीराजेंची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं संभाजीराजेंना पक्षात प्रवेश करुन शिवसेनेच्या (Shivsena) तिकीटावर तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही आणि शिवसेनेनं कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता संभाजीराजे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शक्यता आहे. अशावेळी संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या समर्थकांकडून संभाजीराजेंचा एक व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला जातोय. या व्हिडीओच्या माध्यमातून राजकीय पक्षांना थेट इशारा देण्यात आलाय.

संभाजीराजे समर्थकांनी तयार केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचे रायगडावरील फोटो पाहायला मिळत आहेत. त्या फोटोसह या व्हिडीओत एक डायलॉगही ऐकायला मिळतोय. ‘शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. पण त्या आधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम उभी राहिली आहे त्याचं काय? संभाजीला समजून घेण्याकरिता तुम्हाला तुमचं काळीज शिवाजीचं करुन घ्यावं लागेल. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो’, असा डायलॉग या व्हिडीओत तुम्हाला ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हा इशारा नेमका कुणाला? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजे उद्या मन मोकळं करणार

संभाजीराजे छत्रपती उद्या (27 मे) सकाळी 11 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.

संभाजीराजे शिवरायांसमोर नतमस्तक

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक झालेले आहेत. ‘महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचं आहे. मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…’ असं ट्वीट करत संभाजीराजे यांनी एकप्रकारे आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे संभाजीराजे राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपलं कार्य पुढे नेण्याच्या विचारात असल्याचं पाहायला मिळत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....