Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहास काढला तर लक्षात येईल ‘हमाम मे सब नंगे’, जितेंद्र आव्हाडांचा क्रांती रेडकरला सांभाळून बोलण्याचा सल्ला

मलिक यांच्याकडून पैसा आणि सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा गंभीर आरोप क्रांती रेडकरने केलाय. क्रांती रेडकरच्या प्रत्युत्तरानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तिने सांभाळून बोलावं असा सल्ला दिलाय.

इतिहास काढला तर लक्षात येईल 'हमाम मे सब नंगे', जितेंद्र आव्हाडांचा क्रांती रेडकरला सांभाळून बोलण्याचा सल्ला
जितेंद्र आव्हाड, क्रांती रेडकर
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 5:27 PM

मुंबई : मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. समीर वानखेडे यांचा निकाहनामाच आज मलिक यांनी दाखवला आहे. अशावेळी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. मलिक यांच्याकडून पैसा आणि सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा गंभीर आरोप क्रांती रेडकरने केलाय. क्रांती रेडकरच्या प्रत्युत्तरानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तिने सांभाळून बोलावं असा सल्ला दिलाय. त्याचबरोबर जुना इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम मे सब नंगे, असा सूचक इशाराही आव्हाड यांनी दिलाय. (NCP Leader Jitendra Awhad’s advice to Kranti Redkar to speak carefully)

‘क्रुझवर 4 हजार लोक होते. मात्र, त्यातील फक्त 6 जणांनाच पकडलं, हे काही कळलं नाही. मी पहचान कौन? हे ट्वीट केलं आणि नंतर डिलीट केलं. कारण मला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, ते पोहोचलं, म्हणून डिलीट केलं. क्रांती रेडकरांनी थोडं सांभाळून बोलावं. मागचा इतिहास जर काढला तर लक्षात येईल की हमाम मे संब नंगे. सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं की समीर वानखेडे यांचं सर्टिफिकेट बोगस आहे. त्यामुळे सर्टिफिकेटबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट झालीय, त्यांचं अभिनंदन’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मलिकांच्या आरोपाला क्रांती रेडकरंचं उत्तर

“निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो” असं क्रांती रेडकर म्हणाली.

‘त्यांनी माहिती घ्यायला हवी होती’

“स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती लग्न करतात. त्यांनी धर्म लपवल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. त्यावर नवरा-बायको दोघांच्या सह्या आहेत. मी हिंदू असल्याने इस्लाम धर्माची तेवढी मला माहिती नाही. पण मौलानांनी संविधानानुसार पाहिलं तर समीर तेव्हाही हिंदू होते. त्यांनी माहिती घ्यायला हवी होती” असं क्रांतीने म्हटलंय.

नवाब मलिक नेमकं काय म्हटले?

“माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला देऊन त्यांनी नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एका अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली. गरिब वंचित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.”

इतर बातम्या :

जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट नाहीच! राज्य सरकारचं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

दिन दिन दिवाळी… महाराष्ट्रातील शाळांना 14 दिवसांची सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

NCB Leader Jitendra Awhad’s advice to Kranti Redkar to speak carefully

देशमुखांच्या हत्येनंतर आरोपींचा मुंडेंना फोन, जरांगेंचे गंभीर आरोप
देशमुखांच्या हत्येनंतर आरोपींचा मुंडेंना फोन, जरांगेंचे गंभीर आरोप.
क्रूर हत्येनंतर शास्त्रींच ते वक्तव्य अजाणतेपणामुळे? टीका होताच युटर्न
क्रूर हत्येनंतर शास्त्रींच ते वक्तव्य अजाणतेपणामुळे? टीका होताच युटर्न.
MSRTC ST Protest : एसटी कर्मचाऱ्यांचे आज राज्यभर आंदोलन, मागण्या काय?
MSRTC ST Protest : एसटी कर्मचाऱ्यांचे आज राज्यभर आंदोलन, मागण्या काय?.
मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात अंजली दमानिया आक्रमक
मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात अंजली दमानिया आक्रमक.
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पहिलीचं बैठक, त्यांच्यासमोरच दादा म्हणाले...
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पहिलीचं बैठक, त्यांच्यासमोरच दादा म्हणाले....
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोडलं वाशिमचं पालकमंत्रिपद, काय आहे कारण?
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोडलं वाशिमचं पालकमंत्रिपद, काय आहे कारण?.
महायुतीचा विधीमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणाची लागणार वर्णी?
महायुतीचा विधीमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणाची लागणार वर्णी?.
जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केलं; राऊतांचा गंभीर आरोप
जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केलं; राऊतांचा गंभीर आरोप.
मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी असं काय सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिला
मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी असं काय सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिला.
हकालपट्टीनंतरही सुटका नाही, 'त्या' खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावरच!
हकालपट्टीनंतरही सुटका नाही, 'त्या' खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावरच!.