सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन नवे वादंग! संजय राऊतांची जहरी टीका; तर तक्रार दाखल करण्यासाठी भाजप आक्रमक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. सलमान खुर्शीद हे पुरुष वेषातील कंगनाबेन असल्याची खोचक टीका त्यांनी केलीय. तर भाजपचे आमदार राम कदम हे खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन नवे वादंग! संजय राऊतांची जहरी टीका; तर तक्रार दाखल करण्यासाठी भाजप आक्रमक
सलमान खुर्शीद, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 2:30 PM

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्या एका पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केलीय. खुर्शीद यांच्या या पुस्तकामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपकडून खुर्शीद यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. सलमान खुर्शीद हे पुरुष वेषातील कंगनाबेन असल्याची खोचक टीका त्यांनी केलीय. तर भाजपचे आमदार राम कदम हे खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. (Sanjay Raut’s criticism of Salman Khurshid, while Ram Kadam’s demand to file a case)

संजय राऊत यांची जहरी टीका

‘सलमान खुर्शीद हे पुरुष वेषातील कंगना आहेत. अशा प्रकारची वक्तव्य करुन काँग्रेस पक्षातील काही जुने जाणते म्हणवणारे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते विद्वान आहेत, पुस्तक लिहितात, एखादी ओळश हिंदुत्वावर टाकतात आणि वाद निर्माण करुन आपल्या पोळ्या भाजतात. हिंदू धर्माला आयएसआयएस आणि बोको हरामची उपमा देणं हे सुद्धा कंगनाने केलेल्या देशाच्या अपमानासारखंच आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय.

तक्रार दाखल करण्यासाठी भाजप आक्रमक

दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केलीय. त्यासाठी घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलीय. काँग्रेस नेत्यांचे तळवे चाटण्याचं काम सलमान खुर्शीद करत आहेत. जर शिवसेनेत हिंदुत्व अद्यापही कायम असेल तर त्यांनी खुर्शीद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राम कदम यांनी केलीय. तसंच खुर्शीद यांच्या पुस्तकावर निर्बंध आणा. अन्यथा जिथे जिथे हे पुस्तक मिळेल तिथे या पुस्तकाची होळी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात नेमकं काय?

‘सनराइज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकाचं बुधवारी प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं आहे. ‘सध्याच्या आक्रमक राजकीय हिंदुत्वाने साधू-संतांच्या पूर्वापार आणि प्राचीन हिंदू परंपरेला बाजूला केलं आहे. आत्ताचे हिंदुत्व हे आयएसआयएस आणि बोको हराम या इस्लामिक संघटनांप्रमाणे जिहारी प्रवृत्तीचे आहे’, असा वादग्रस्त उल्लेख खुर्शीद यांनी केलाय.

इतर बातम्या :

जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात, तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल; राऊतांचा इशारा

लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, कंगनाचा पद्मश्री काढून घ्या; नवाब मलिक आक्रमक

Sanjay Raut’s criticism of Salman Khurshid, while Ram Kadam’s demand to file a case

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.