Video : ‘हृदयावर हात ठेवून सांगा आमच्या धक्क्याने त्या महिला पोलीस अधिकारी पडल्या का?’ संदीप देशपांडेंचा सवाल; पोलिसांकडून शोध सुरु

संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलाय. आमच्या धक्क्यामुळे त्या महिला पोलीस कर्मचारी पडल्या नाहीत. पोलीस आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. आम्ही कायदेशीररित्या सामोरं जाऊ, असं देशपांडे यांनी या व्हिडीओत म्हटलंय.

Video : 'हृदयावर हात ठेवून सांगा आमच्या धक्क्याने त्या महिला पोलीस अधिकारी पडल्या का?' संदीप देशपांडेंचा सवाल; पोलिसांकडून शोध सुरु
संदीप देशपांडे यांनी आरोप फेटाळले, पोलिसांना आवाहनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 8:51 PM

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मोठा राडा पाहायला मिळाला. मनसे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर पडले असता माध्यमांसमोर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना चकवा देत ते आणि संतोष धुरी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. नेमकं त्याच वेळी एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडल्या. त्यावर आता संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि मनसेवर सरकारी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली जातेय. देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस (Shivaji Park Police) ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून त्यांचा कसून शोधही घेतला जातोय. अशावेळी संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलाय. आमच्या धक्क्यामुळे त्या महिला पोलीस कर्मचारी पडल्या नाहीत. पोलीस आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. आम्ही कायदेशीररित्या सामोरं जाऊ, असं देशपांडे यांनी या व्हिडीओत म्हटलंय.

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

आज सकाळी 11 वाजता मी आणि संतोष धुरी राजसाहेब ठाकरेंना भेटायला गेलो होतो. तिथून बाहेर आल्यावर मीडियातील अनेक लोक उभे होते. त्यांनी बाईट देण्याबाबत सूचना केली. तेव्हा शिवाजी पार्कचे पोलीस निरीक्षक कासार साहेब आले आणी मला खेचायला लागले. त्यांना मी विचारलं की तुम्ही मला ताब्यात घेताय का? तसं असेल मला सांगा मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. नाही आम्ही तुम्हाला ताब्यात घेत नाही फक्त बाजूला या. रस्त्यावर सगळी गर्दी झालीय असं मला त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही पुढे चालत फुटपाथवर आलो आणि तिथे मीडियाला बाईट दिला. मीडिया याला साक्षीदार आहे. बाईट दिला आणि त्यानंतर त्यांनी मला घेराव घेतला. मी पुन्हा त्यांना विचारलं की तुम्ही मला ताब्यात घेताय का? तेव्हाही ते बोलले की नाही बाजूला या बाजूला या. माझी गाडी उभी होती माझ्यासोबत संतोष धुरी होते. सर्व माध्यमकर्मी वन टू वन करायचा म्हणून माझ्याकडे आले. मी गाडीत बसलो असताना कासार साहेब मला खेचायला लागले. संतोष धुरी माझ्या बाजूला बसला असल्यामुळे त्यांना खेचता आलं नाही आणि आमच्या ड्रायव्हरने गाडी पुढे नेली. हा पूर्ण घटनाक्रम असा झाला. ती गाडी पुढे गेली. त्यानंतर मी जेव्हा बातम्या पाहत होतो, त्यात आमची गाडी पुढे गेली, आमच्या गाडीच्या 15 – 18 फुट मागे त्या महिला अधिकारी पडल्या. जर आमची गाडी पुढे जात असेल तर मागे असलेली व्यक्ती कशी काय पडू शकते आमच्या गाडीच्या धक्क्याने.

हे सुद्धा वाचा

कासारसाहेब हृदयावर हात ठेवून सांगा…

नंबर दोन त्या ज्या महिला अधिकारी होत्या, पोलिसांचा प्रोटोकॉल पाहिला तर पुरुष पोलीस अधिकारी असताना महिला अधिकारी पुरुषांना पकडायला पुढे जात नाहीत. माझ्या बाजुला तिथे सात ते आठ पोलिसांचं कडं होतं. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांनी मला पकडण्याचा किंवा संतोष धुरीला पकडण्याचा प्रश्नच येत नाही. त्या महिला अधिकाऱ्यांना आमच्या स्पर्शही झाला नाही. तुम्ही हे फुटेजमध्येही पाहू शकता. मग आम्ही त्यांच्यावर गाडी घातली, आमच्या धक्क्याने त्या का पडल्या, असे आरोप आमच्यावर का होत आहेत? माझा प्रश्न आहे कासार साहेबांना, मी रोज भेटतो त्यांना. कासारसाहेब हृदयावर हात ठेवून सांगा आमच्या धक्क्याने त्या महिला पोलीस अधिकारी पडल्या का?

आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का?

आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला सहकार्य केलंय. ज्या ज्या वेळी आंदोलनं केली संदीप देशपांडे स्वत: पोलीस स्टेशनला हजर झालाय. आंदोलन पळून जायची आम्हाला गरज नाही, आम्ही घाबरलेलो नाही. आंदोलनं केली असतील तर सर्व कायदेशीर प्रक्रियाही आम्ही पार पाडली आहे. तुम्ही हजर व्हा बोलल्यावर आम्ही हजरही झालो आहोत. मी आज कुठेही आंदोलन केलं नाही. कुठल्याही आंदोलनात सहभागी नव्हतो. मग जबरदस्तीने पकडत असाल तर आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का?

‘पोलिसांचा धक्का लागला हे व्हिडीओत स्पष्ट दिसतंय’

त्या महिला अधिकाऱ्यालाही आमची विनंती आहे की, ठीक आहे तुमची नोकरी आहे, तुमच्यावर दबाव आहे. पण एकदाच म्हणून सांगा देवाला की आमचा किंवा आमच्या गाडीचा स्पर्श तुम्हाला झाला का? नसेल झाला तरी तुम्हाला तसा जबाब द्यावासा वाटत असेल तर माझं काही म्हणणं नाही. एकवेळ मी खोटं बोलेन, तुम्ही खोटं बोलाल पण सीसीटीव्ही फुटेज खोटं बोलणार नाही, जे सन्माननीय राज साहेबांच्या घराच्या बाहेर आहे. तुम्ही आमच्या मागे धावत होतात, पोलिस धावत होते. त्यावेळी पोलिसांचा धक्का लागला हे स्पष्ट दिसतंय. तरी तुम्हाला आमच्या विरोधात गुन्हे दाखल करायचे असतील, कारण आम्ही सरकार विरोधात, उद्धव ठाकरेंविरोधात बोलतो, संजय राऊतांच्या विरोधात बोलतो तर आमच्याविरोधात गुन्हे नोंदवा. आम्ही जेलला घाबरत नाही. आम्ही पोलीस कोठडीला घाबरत नाही, कायेदशीर प्रक्रिया पूर्ण करायला आम्ही तयार आहोत.

‘खोट्या केसेस घालाल तर ते सहन करणार नाही’

ज्या ज्या वेळेला आंदोलनं केली त्या त्या वेळेला हजर झालो आहे. पण अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणार असाल तर आम्ही हे सहन करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझी पोलिसांना विनंती आहे की, माझी बायको घरी एकटी असते आणि घरी 6 वर्षाचा मुलगा आहे. ज्या प्रकारे तुम्ही रात्री 12 – 1 वाजता पुरुष पोलीस म्हणून घरात घुसता ते करु नका, पोलीस आहात पोलिसांसारखे वागा. मी घरी नाही. मी कायदेशीर सल्ला घेतोय. जो कायदेशीर सल्ला मला मिळेल मी त्याप्रमाणे वागेल हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि किती दिवस मला जेलमध्ये ठेवणार आहात? 10, 20 दिवस एक महिना मी घाबरत नाही. मी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला तयार आहे. पण या पद्धतीने दबाव टाकाल आणि खोट्या केसेस घालाल तर ते ही मी सहन करणार नाही. माझा कायद्यावर आणि न्यायालयावर विश्वास आहे. मीडियातही काही बातम्या आल्या की आम्ही धक्का दिला. त्यांना माझी विनंती आहे त्यांनी आपलं फुटेज चेक करावं ही माझी नम्र विनंती आहे.

शिवतीर्थाबाहेर नेमकं काय घडलं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.