Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेपूर्वी संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट, ‘लाव रे तो व्हिडीओ’ची पुन्हा चर्चा
गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेले भाषण भाजपने (BJP) लिहून दिलेली स्क्रिप्ट होती. अशी टीका भाषण झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. "पण मनसे स्थापनेपासून केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी याआधीही ते सर्व मुद्दे घेतले होते. हे सर्वांना पुराव्यासह पटवून देणार आहेत.
मुंबई – गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेले भाषण भाजपने (BJP) लिहून दिलेली स्क्रिप्ट होती. अशी टीका भाषण झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. “पण मनसे स्थापनेपासून केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी याआधीही ते सर्व मुद्दे घेतले होते. हे सर्वांना पुराव्यासह पटवून देणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंची ‘लाव रे तो व्हिडीओ’ संकल्पना अनेकांना आवडली होती. ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून त्यावेळी राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर साधला होता निशाणा. राज ठाकरे यांची आजची ठाण्यातली सभा विरोधकांसाठी ही उत्तर सभा आहे. ‘लाव रे तो व्हिडिओ’ राज ठाकरे विसरलेत का असे म्हणणाऱ्यांना आजच्या सभेत नक्की उत्तर मिळेल. वसंत मोरे नाराची सुध्दा दूर केली आहे. मराठी आमची श्वास आहे दुसऱ्या भाषेत ट्विट करत नाही, संजय राऊत मराठीचा गजर करतात आणि शेर मात्र हिंदीत लिहितात असं सूचक ट्विट” काही वेळापुर्वी संदीप देशपांडेंनी केलं आहे.
राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना “लावरे तो व्हिडीओ”ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 12, 2022
संदीप देशपांडे यांचं सुचक ट्विट
आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. शिवाजी पार्क मेळाव्यानंतर त्याच्या भाषणाची चर्चा महाराष्ट्रात होती आणि आजही आहे. त्यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्याला घेऊन भाषण केलं होतं. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी घाटकोपरमध्ये पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणावरती टीका केली होती. आज त्यांना राज ठाकरे कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहावे लागेल. संदीप देशपांडे यांच्या सुचक ट्विटमुळे आज कोणाला टार्गेट करणार अशी चर्चा आहे.
टीकेला उत्तर देण्यासाठी सभा
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती सडकून टीका केली.खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर राज ठाकरेंनी निशाणा साधला. राज ठाकरेच्या भाषणावरती अनेकांनी टीका केली. त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावरती सुप्रिया सुळे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत अशा प्रमुख नेत्यांनी टीका केली. याच सर्व प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची ठाण्यात सभा आयोजित केली आहे.