Sandipan Bhumare : संदीपान भुमरे यांनी सांगितला सुरत दौऱ्याचा प्रवास, संभाजीनगरमध्ये भगवा आपल्याच नेतृत्वात भडकविण्याचा बांधला चंग
महाविकास आघाडीत मंत्री होतो पण काम होत नव्हते. सकाळ, दुपार, संध्याकाळ आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत होतो, असं म्हणायचो. लोकांना आम्ही काय सांगणार. वाईट वाटायचं. आमचे मुख्यमंत्री आम्हाला कधीच भेटत नव्हते.
मुंबई : कुठल्याही निवडणुका असू द्या. संभाजीनगरमध्ये भगवा आपल्या नेतृत्वात फडकवणार असल्याचं संदीपान भुमरे यांनी मुंबईत सांगितलं. सूतगिरणीच्या करायच्या वेळेस त्या वेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोललो होतो. पण ठाकरे यांनी काम केलं नाही, अशी खंत संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली. तुम्ही ते काम केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणाले. आमच्याकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निधी हवा होता. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे गेलेलो त्यांना निधीसाठी बोललो. पण निधी दिला नाही. तुम्ही ते काम केलं, असंही मुख्यमंत्री शिंदे यांना म्हटलं. संदीपान भुमरे हे मुख्यमंत्री शिंदे यांना म्हणाले, आम्ही मंत्री असताना तुमच्यासोबत गेलो. आम्हाला शिंदे यांनी फोन केला. सुरतला (Surat) कसे गेलो, याचा किस्सा संदीपान भुमरे यांनी यावेळी सांगितला. भुमरे म्हणाले, आपल्याला निघायचं आहे. असं म्हणून अब्दुल सत्तार यांना माझ्या बंगल्यावर बोलवले. तेवढ्यात चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) तिथे आले.
पुढे जायचं कुठं कळत नव्हतं
चंद्रकांत खैरे यांना माहीतच नव्हतो की आम्हाला बाहेर जायचं होतं. ते बसले होते. आम्हाला निघायचं होतं. आमची कुजबुज सुरू होती. ते निघाले की शिंदे तुम्ही म्हणाला ठाण्याकडे चला. त्यानंतर ठाण्याकडे गेलो तर तुम्ही म्हणालात पुढे चला. सत्तार म्हणे पुढे चला पुढे चला. पण पुढे जायचं कुठे कळत नव्हतो. आता सगळं व्यवस्थित झालं. शिंदेंसोबत पदासाठी आम्ही नाहीत. तालुक्याच्या फायद्यासाठी आहोत. मला म्हणे वॉचमन होता. अरे पण मी झेंडे रोवले. एकहाती सत्ता पैठणमध्ये आणलीय. आरोपाला आम्ही डागमगलो नाही, हेही भुमरे यांनी ठामपणे सांगितलं.
मतदारांशी खोट बोलावं लागायच
एकनाथ शिंदे यांना उद्देशून भुमरे म्हणाले, सभागृहात तुमचं भाषण ऐकून रडू आलं. अख्खा महाराष्ट्र टीव्ही समोर होता, ते सगळे रडले. अनेक काम करण्याचा प्रयत्न होता. महाविकास आघाडीत मंत्री होतो पण काम होत नव्हते. सकाळ, दुपार, संध्याकाळ आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत होतो, असं म्हणायचो. लोकांना आम्ही काय सांगणार. वाईट वाटायचं. आमचे मुख्यमंत्री आम्हाला कधीच भेटत नव्हते. वर्षावर भेट जरी झाली तरी मुख्यमंत्री दोन मिनिटं बसून म्हणायचे. दुसरे लोक मला भेटायला आले. नंतर बैठक लावू.