बाळासाहेबांच्या सभेचा दाखला देत भुमरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांची सभा भव्यच होणार…”
50 कोटींची आम्हाला गरज नाही मला मंत्री केलं मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे, असं भुमरे म्हणाले आहेत.
औरंगाबाद : संदीपान भुमरे (Sandipan Bhumar) यांनी चंद्रकांत खैरे यांना कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय. “सभा वादात सापडली नाही, हेच लोक स्वतः ऑडिओ क्लिप तयार करत आहेत, खोटी कागदपत्रे तयार करत आहेत पण याचा परिणाम होणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यात भव्य सभा व्हायची. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीही सभा भव्य होणार”, असं संदीपान भुमरे म्हणाले आहेत. 50 कोटींची आम्हाला गरज नाही मला मंत्री केलं मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे, असंही भुमरे म्हणाले आहेत.