Sangli loksabha : विशाल पाटील यांच्या नाराजीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया
चंद्रपूरचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं. निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार करुन अटक करण्याची मागणी करु. महाराष्ट्रात अशा पद्धतीच वक्तव्य करुन, मुनगंटीवार यांनी त्यांची लायकी दाखवली अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली.
महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद झाली. त्यात सांगली लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार असल्याच स्पष्ट झालं. हा सांगली जिल्ह्यातील स्थानिक नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासाठी धक्का आहे. कारण सांगली जिल्ह्यात या दोन्ही युवा नेत्यांची ताकद आहे. मागच्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते सांगलीची जागा काँग्रेसनेच लढवावी यासाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन हायकमांडची भेट सुद्धा घेतली होती. पण आता सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे विशाल पाटील, विश्वजीत कदम नाराज झाले आहेत. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
विशाल पाटील, विश्वजीत कदम दोघेही नॉट रिचेबल झाले आहेत. मविआमध्ये सांगलीच्या जागेचा निर्णय झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “हायकमांडच्या आदेशाच सगळे पालन करतील. लोकशाही, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. त्यांचं समाधान आम्ही करु” असं नाना पटोले म्हणाले. “आजचा दिवस हा गुढी पाडव्याचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मविआने जे निर्णय घेतले ते महाराष्ट्राच्या हिताचे, शेतकरी, तरुण, गरीब वर्ग यांचं हित डोळ्यासमोर ठेऊन घेतले” असं नाना पटोले म्हणाले.
विजयाची गुढी कोण उभारणार?
“भाजपाच तानाशाही सरकार शेतकरी, तरुण, गरीब यांना संपवून मूठभर उद्योगपतींसाठी काम करतय. भाजपाचा पानिपत करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने घेतला आहे. फडणवीस नाही, इंडिया आघाडी विजयाची गुढी उभारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला” सांगलीत कुठलाही वाद नाही, हे सुद्धा पटोले यांनी सांगितलं.
‘मुनगंटीवार यांनी त्यांची लायकी दाखवली’
भाजपाच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. चंद्रपूरचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं. निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार करुन अटक करण्याची मागणी करु. महाराष्ट्रात अशा पद्धतीच वक्तव्य करुन, मुनगंटीवार यांनी त्यांची लायकी दाखवली अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली.