संजना नाही तर ईशा आता माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव

हर्षवर्धन जाधव यांनी संजना यांना आता संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत.

संजना नाही तर ईशा आता माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 10:39 PM

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यातील राजकारण आता चांगलच पेटलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून त्याचा प्रत्यय सातत्याने येत आहे. त्यातच आता हर्षवर्धन जाधव यांनी संजना यांना आता संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत.(Sanjana Jadhav should not name Sanjana Harshvardhan Jadhav, appeal of Harshvardhan Jadhav)

हर्षवर्धन जाधव सध्या त्यांच्या सहकारी ईशा झा यांच्यासह मतदारसंघात दौरे आणि मेळावे करत आहेत. दुसरीकडे संजना जाधवही राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. संजना जाधव या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार समारंभात दिसून येत आहेत. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात संजना जाधव या माझी पत्नी म्हणून कन्नड-सोयगाव मतदारसंघात फिरत आहेत. ज्या पतीला तुम्ही हा माणूस बरोबर नाही असं म्हणताय, त्याच्या नावाने फिरणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडीओत म्हटलंय.

‘माझ्या जोडीदार आता ईशा’

इतकच नाही तर, तुम्ही अत्यंत वाईट पद्धतीनं त्रास देत आहात. ग्रामपंचायत निवडणुकीतही तुम्ही तुमच्याच मुलाविरोधात पॅनल उभा केला. आता पुन्हा मतदारसंघात फिरत असताना तुम्ही संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरत आहात. हा घाणेरडेपणा आहे. राजकारणासाठी, स्वार्थासाठी माणूस किती खाली पडू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणून संजना जाधव आहेत. मी मतदारसंघातील तमाम नागरिकांना सूचना करतो की, माझ्या जोडीदार आता ईशा आहेत, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

‘त्यांनी संजना दानवे म्हणून फिरावं’

मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अशावेळी त्या आपण संजना हर्षवर्धन जाधव असल्याचं सांगत असतील तर हा निर्लज्जपणा आपण लक्षात घ्यावा. मध्यंतरी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मला आणि ईशाला माझ्या मातोश्रींनी आशीर्वाद दिले आहेत. अशास्थितीत संजना या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी म्हणून फिरत असतील तर ही लाजिरवाणी बाब आहे. त्यात कुणीही समाविष्ट होऊ नये. संजना यांनी संजना दानवे म्हणून नक्की फिरावं, असंही हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडीओमध्ये म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 | ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे

“मला दानवेंचा जावई म्हणू नका” माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज

Sanjana Jadhav should not name Sanjana Harshvardhan Jadhav, appeal of Harshvardhan Jadhav

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.