Sanjay Nirupam : नेहरु सेक्युलरिज्म, राम मंदिर, धर्म, संजय निरुपम यांचा काँग्रेसवर सर्वात मोठा वैचारिक हल्लाबोल
"आज 70 वर्षानंतर नेहरु सेक्युलरिज्ममध्ये धर्माचा आग्रह, अस्तित्वाला विरोध आहे. धार्मिक असण्याला विरोध होतो. या विचारधारेच वय संपलय. हे काँग्रेस मान्य करायला तयार नाहीय. आज दुर्भाग्याने हे नेहरु सेक्युरलिज्म पुढे घेऊन जाणारे लेफ्टिस्ट कम्युनिस्ट आहेत"
“काँग्रेस पक्षात वैचारीक पातळीवर लढाई चालू आहे. कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि नाराजी आहे. हे असच चालू राहिलं, तर पुढे जाऊन बरच काही बिघडेल. वैचारीक पातळीवर काँग्रेसने म्हटलं, आम्ही सेक्युलर पक्ष आहोत. सेक्युलरिज्ममध्ये काही चुकीच नाही. पण गांधीच्या सेक्युलरिज्ममध्ये धर्माचा विरोध नव्हता. ते सर्वधर्मसमभाव मानायचे. ते नेहरुंनी स्वीकारलं. पुढे नेहरु सेक्युलरिज्ममध्ये धर्माला विरोध आहे. ती विचारधारा चालू राहिली. नेहरु सेक्युलरिज्मची विचारधारा लोकांमध्ये रुजली. त्यानंतर नेहरु 17 वर्ष पंतप्रधान होते. ते सेक्युलरिज्म लोकांमध्ये भिनलं. सगळ्या विचाराधारांच एक टाइम लिमिट असतं. एक वयानंतर विचारधारा मरते. कम्युनिजन याच उत्तम उदहारण आहे” असं संजय निरुपम म्हणाले.
“आज 70 वर्षानंतर नेहरु सेक्युलरिज्ममध्ये धर्माचा आग्रह, अस्तित्वाला विरोध आहे. धार्मिक असण्याला विरोध होतो. या विचारधारेच वय संपलय. हे काँग्रेस मान्य करायला तयार नाहीय. आज दुर्भाग्याने हे नेहरु सेक्युरलिज्म पुढे घेऊन जाणारे लेफ्टिस्ट कम्युनिस्ट आहेत. ते स्वत: संपलेत. काँग्रेसमध्ये डाव्या विचारसरणीची लोक भरली आहेत. ही लोक राहुल गांधी यांच्या आसपास आहेत” असा आरोप संजय निरुपम यांनी केला. “रामलला विराजमान होण्याला लेफ्टिस्टनी विरोध केला. अनेकांना रामलला विराजमान होण्याच्या कार्यक्रमाला बोलावल होतं. त्यावेळी अनेक जण गेले नाहीत, त्यांनी आभार मानले. पण कोणी आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही” असं संजय निरुपम म्हणाले.
हा डाव्यांचा काँग्रेसवरचा प्रभाव
“फक्त एकमेव काँग्रेस पक्षाची चिठ्ठी होती की, राम मंदिर उद्घटन सोहळा हा भाजपाचा प्रचार आहे. त्या आधारावर रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. रामावरची आस्था नाकारली. त्यानंतर फजिती झाली. काँग्रेसचे पवक्ते तीन-चार दिवस उत्तर देत होते. हा डाव्यांचा काँग्रेसवरचा प्रभाव आहे” असा आरोप संजय निरुपम यांनी केला.
‘अर्धे आऊटडेटेड, भंगारात गेलेले लोक’
“आजचा हिंदुस्थान धार्मिक झालाय. क्रिकेटर्स, फिल्मकार जे मंदिरात जात नव्हते, ते आज देवळात जातायत. हा धर्माचा आग्रह कुठे चुकीचा नाहीय. काँग्रेस पार्टीच वैचारिक पातळीवर महत्त्व संपलय. म्हणून लोक दूर जातायत. संघटनात्मक स्तरावर जे मुद्दे उपस्थित होतायत, ज्या घोषणा दिल्या जातात. त्या घरात कोणी बोलणार नाही. काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेतृत्वावर असे लोक आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष तळागाळातील जनतेशी संपर्क नाहीय. अर्धे आऊटडेटेड, भंगारात गेलेले लोक आहेत. आज अशा लोकांच्या हाती काँग्रेसची कमान आहे, म्हणून संजय निरुपम जे म्हणतोय, ते ऐकणार कोणी नाही” असं ते म्हणाले.