महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना आरक्षण द्या : संजय निरुपम
मुंबई : महाराष्ट्रात उत्तर भारतीयांनाही आरक्षण द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. यासंदर्भात मागणी करताना संजय निरुपम यांनी स्पष्ट केले की, ” आमच सरकार होतं, तेव्हा आम्ही उत्तर भारतीयांना आरक्षण दिलं नाही, ही आमची चूक ठरली. मात्र, सर्व उत्तर भारतीयांना आरक्षण द्या, असेही मी म्हणत नाही.” जात एकच पण वेगळ्या […]
मुंबई : महाराष्ट्रात उत्तर भारतीयांनाही आरक्षण द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. यासंदर्भात मागणी करताना संजय निरुपम यांनी स्पष्ट केले की, ” आमच सरकार होतं, तेव्हा आम्ही उत्तर भारतीयांना आरक्षण दिलं नाही, ही आमची चूक ठरली. मात्र, सर्व उत्तर भारतीयांना आरक्षण द्या, असेही मी म्हणत नाही.”
जात एकच पण वेगळ्या आडनावांमुळे आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यावर तोडगा काढायला हवा, असेही संजय निरुपम यांनी म्हटले.
‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ कार्यक्रमात संजय निरुपम, भाई जगताप, नितेश राणे, शायना एनसी हजर होत्या. त्यांनी आरक्षणासह राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली.
संजय निरुपम यांना नितेश राणेंचे उत्तर
उत्तर भारतीय महाराष्ट्रात येऊन आरक्षण मागू लागले, तर मग इथल्या मराठी माणसाने जायचं कुठं? सर्वात आधी इथल्या स्थानिकांचा अधिकार आहे, असे नितेश राणे यांनी संजय निरुपम यांनी उत्तर दिले. तसेच, आधी स्थानिकांचा विचार करा, मग संघर्ष होणार नाही, असेही नितेश राणेंनी म्हटले.
ओबीसींनी घाबरायचे कारण नाही : नितेश राणे
“ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसेल का, असा प्रश्नच विचारणे बंद करा. त्या प्रश्नाने संशय निर्माण होत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी समाजाने घाबरायचं कारण नाही, मराठा आरक्षणाने कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही.”, असे नितेश राणे यांनी सांगितले.