Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Cabinet Expansion : मविआच्या काळात भाजपकडून टीकेची झोड, आता मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात!, संजय राठोडांकडून गोपनियतेची शपथ

आज मंत्रिमंडळ विस्तार!

Maharashtra Cabinet Expansion : मविआच्या काळात भाजपकडून टीकेची झोड, आता मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात!, संजय राठोडांकडून गोपनियतेची शपथ
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 12:05 PM

मुंबई : अशक्य तेच शक्य होतं ते केवळ राजकारणातच! ज्यांच्यावर भाजपने कठोर शब्दात टीका केली. त्यांनाच आता मंत्रिमंडळात स्थान दिलंय. शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion 2022) स्थान देण्यात आलंय. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता त्याचं पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या मतदारचे आमदार आहेत. मविआ सरकारमध्ये वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग मंत्री होते. तसंच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं. आता त्यांना कोणतं खातं दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?

बीडमधील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केलेली. तिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालेली. तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले होते. या आरोपानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पूजा चव्हाणच्या कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय राठोड कुटुंबासह नॉट रिचेबल झालेले. काही काळानंतर ते पुन्हा बंजारा समाजातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले. अखेरीस पुण्यातील वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसल्याचा खुलासा केला होता. पुजाचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा खुलासा पोलिसांनी केल्यानंतर संजय राठोड यांना दिलासा मिळाला होता.

हे सुद्धा वाचा

संजय राठोड बंजारा समाजातून येतात. शिवसैनिक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या संजय राठोड यांनी काँग्रेसच्या गडामध्येच कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांना यवतमाळचं शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाही मिळालं. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी झंझावाती पक्ष बांधणी करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना रुजवली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा दारुण पराभव केला आणि काँग्रेसच्या गडावर भगवा झेंडा फडकावला.

कोण आहेत संजय राठोड?

  • संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत
  • शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
  • त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.
  • फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
  • 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.
  • संजय दुलीचंद राठोड हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत.
  • ते दिग्रस विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.
  • 2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
  • 2014 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांना महसूल विभाग देण्यात आला.
  • यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारीदेखील देण्यात आली.
  • 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.