राजीनामा दिला तो स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, फडणवीस अजूनही सरकारवर साशंक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे.

राजीनामा दिला तो स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, फडणवीस अजूनही सरकारवर साशंक
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 4:17 PM

मुंबई: पहिल्याच दिवशी हे प्रकरण बाहेर आलं त्याच दिवशी राजीनामा यायला हवा होता. एवढे पुरावे असताना मंत्री म्हणून रहायला नको होतं. राजीनामा दिला खरं पण ते स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. (Sanjay Rathod resignation Devendra Fadnavis slams Sanjay Rathod and Mahavikas Aghadi Government in Pooja Chavan Suicide case)

हा उशिरा आलेला राजीनामा

खरं म्हणजे पहिल्याच दिवशी प्रकरण पुढं आल्यावर राजीनामा घ्यायला हवा होता. संजय राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वीद असल्याचं वाटत असल्यानं राजीनामा द्यायला उशीर झाला. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत? राजीनामा घेतला आहे पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. बूंद से गयी वो हौदसे नही आती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्या पोलिसांवर कारवाई का नाही?

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला 20 दिवस होऊन गेले तरी देखील पोलिसांनी कारवाई केली नाही. या प्रकरणात सर्व पुरावे असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्या पोलिसांवर कारवाई झालं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी हा विषया लावून धरला त्यामुळे राजीनामा दिला गेला. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल म्हणून हे झाले. राजीनामा झाला, आता एफआयआर करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

संजय राठोडांना शक्तीप्रदर्शन महागात पडलं?

गंभीर आरोप झाल्यानंतर 15 दिवसांनी संजय राठोड माध्यमांसमोर आले. मात्र, त्यांनी यावेळी आपल्या भोवतीचं संशयाचं धुकं कमी करण्याऐवजी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत गर्दी न करता नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्याला संजय राठोड यांनी हरताळ फासत मोठी गर्दी जमवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली. कोरोनाचा विचार करुन मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि इतर अनेकांनी आपले दौरे रद्द केले होते. मात्र, संजय राठोड यांनी या काळातही गर्दी जमवत शक्ती प्रदर्शन केल्यानं आघाडी सरकारबाबत चुकीचा संदेश केला. यावरुन भाजपनेही सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली.

संबंधित बातम्या

संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?

संजय राठोडांच्या ‘त्या’ 10 चुका ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला

(Sanjay Rathod resignation Devendra Fadnavis slams Sanjay Rathod and Mahavikas Aghadi Government)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....