Sanjay Raut: पवार-ठाकरेंच्या बैठकीत काय झालं? संजय राऊत म्हणाले, 10 बंडखोर आमदार पवारांसमोर बोलले, शिंदेची वेळ फिरतेय?

| Updated on: Jun 25, 2022 | 11:18 AM

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कालही शरद पवार आणि राष्ट्रवादीचे काही नेते मातोश्रीवर आले होते. त्यांच्यासमोर आम्हाला तिथून दहा आमदारांनी फोन केले होते. त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली आहे. या फ्लोअर टेस्टला सामोरे जा. कुणात किती दम आहे ते कळेल. संजय राऊत हवेत बोलत नाहीत. जे उद्धव ठाकरे सांगतात तेच मी सांगतो. आमच्याकडे कोणती ताकद आहे हे मला माहीत आहे.

Sanjay Raut: पवार-ठाकरेंच्या बैठकीत काय झालं? संजय राऊत म्हणाले, 10 बंडखोर आमदार पवारांसमोर बोलले, शिंदेची वेळ फिरतेय?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष सुरूच आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर राजकिय घडामोडींचा प्रचंड वेग आलायं. एकनाथ शिंदे यांचा गट आज राज्यपालांना पत्र देणार असल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचे हे पत्र असेल. राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) धोक्यात आहे. शिंदे गट हीच शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदेंकडून केला जातोयं. शिवसेनेला हा मोठा धक्का असणार आहे. यामुळे सरकार अल्पमतात येण्याची देखील शक्यता आहे. यादरम्यान 10 बंडखोर आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी बोलले असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

शरद पवार यांची मातोश्रीवर बैठक

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कालही शरद पवार आणि राष्ट्रवादीचे काही नेते मातोश्रीवर आले होते. त्यांच्यासमोर आम्हाला तिथून दहा आमदारांनी फोन केले होते. त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली आहे. या फ्लोअर टेस्टला सामोरे जा. कुणात किती दम आहे ते कळेल. संजय राऊत हवेत बोलत नाहीत. जे उद्धव ठाकरे सांगतात तेच मी सांगतो. आमच्याकडे कोणती ताकद आहे हे मला माहीत आहे, असेही बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत. हे 10 बंडखोर आमदार शरद पवार यांना नेमके काय बोलले आणि त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे लवकर कळेल.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार

शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिंदेंच्या बंडावर अजून काय पाऊले शिवसेनेकडून उचलली जातील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. ज्या आमदरांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, आता आमदारांच्या कुटुंबियांचे पोलिस संरक्षण काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नाहीतर राऊत म्हणाले की, आमदारांना संरक्षण दिले जाते, त्यांच्या कुटुंबियांना नाही.