Sanjay Raut : नारायण राणे यांनी उल्लेख केलेल्या अग्रलेखात काय आहे, वाचा

नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात वाद सुरु झालाय. परंतु हा वाद सामन्याच्या अग्रलेखावरुन रंगलाय. या अग्रलेखात नेमके काय म्हटलंय पाहूया..

Sanjay Raut : नारायण राणे यांनी उल्लेख केलेल्या अग्रलेखात काय आहे, वाचा
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 4:20 PM

सिंधुदुर्ग : संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा तुरुंगात जाण्याचा मार्ग मी मोकळा करणार आहे. १०० दिवस जेलमध्ये जाऊन आला तर कमी वाटतायत.. मी २६ डिसेंबरचा तो अग्रलेख (Editorial) जपून ठेवलाय. मी वाचून विसरणारा नाही.लक्षात ठेवणारा आहे. वकिलांना ते पाठवून ठेवलंय. कारागृहात १०० दिवस राहिले हे ते विसरले, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊत यांना दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील कार्यक्रमात नारायण राणे यांनी राऊतांना इशारा दिला. त्यामुळे 26 डिसेंबरच्या त्या अग्रलेखात नेमकं काय होतं, त्याच्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय.

सामनाच्या २६ डिसेंबरच्या अग्रलेख ठग-पेंढाऱ्यांचे राज्य या मथळ्याखाली लिहिलंय. राज्यात सरकार नसून ठग-पेंढाऱ्या टोळीचं राज्य आहे, असे अग्रलेखात म्हटलंय.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न सोडून दुसऱ्या मुद्द्यांवर राजकारण सुरू आहे. कारण राज्यात सरकार नसून एका बेकायदेशीर टोळीचे राज्य सुरू आहे. भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकात रयतेची लुटमार आणि वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या उदयास आल्या होत्या. त्यात पेंढाऱ्यांची सशस्त्र टोळी राजाश्रयाने उदयास आली. तर दुसरी टोळी ठगांची होती. ठगांची टोळी धार्मिक हिंसाचार घडवून आपला मतलब साधणारी भूमिगत संघटना होती. महाराष्ट्रात सध्या अशा ठग आणि पेंढाऱ्यांचीच चलती आहे. राज्य त्यांच्या हुकमाने चालते, अशी बोचरी टीका सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर केली आहे.

महाराष्ट्रात व मुंबईसारख्या शहरात कधीकाळी अंडरवर्ल्डचे वर्चस्व होते. त्याची जागा आता ठग व पेढाऱ्यांनी घेतलीय. हे ठग-पेंढारी थेट सत्तेत सामील झाले आहे. आता आमदार जाहीरपणे खोके घेतल्याची कबुली देताय. होय, होय आम्ही खोके घेतले तुमच्या पोटात काय दुखतेय? अशा प्रकारे आमदारांनी लाज सोडल्यावर सरकारला निर्लज्ज सरकार आहे. देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहे. सत्यवचनी रामाचे नाव घ्यायचे व भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचे भजन गायचे, अशी टीका केली आहे.

सामनाच्या अग्रलेखात केलेली ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलेली दिसतंय. यामुळे या अग्रलेखावरुन भाजप म्हणजेच नारायण राणे कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.