Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे धनुष्यबाणावरच दावा करणार? संजय राऊत म्हणतात ‘करु दे’

Eknath Shinde News : आज शिंदे गटातून परतलेले दोन शिवसेना आमदार पत्रकार परिषद घेणार आहे

Sanjay Raut vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे धनुष्यबाणावरच दावा करणार? संजय राऊत म्हणतात 'करु दे'
वाचा काय म्हणाले, राऊत..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 11:00 AM

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde News) बंडानं शिवसेनेला अक्षरशः घाम फोडलाय. पण अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा संजय राऊत करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेवरच (Shiv sena) दावा ठोकतील, धनुष्यबाण टेक ओव्हर करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. एकनात शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षावर दावा ठोकला जाऊ शकतो, किंवा धनुष्यबाण या चिन्हावर कब्जा करण्याची शिंदेची मनिषा आहे, असं बोललं जातंय, त्यावर तुमचं मत काय? असं राऊतांना (Sanjay Raut vs Eknath Shinde) विचारण्यात आलं होतं. त्यावर राऊतांनी ‘करु दे’ असं म्हणत टोला लगावला आहे. त्यांच्या या दोन शब्दांच्या उत्तराचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.

राऊतांची टोलेबाजी

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढलीय. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतही शिवसेनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलं आहे. आमदार आणि पक्ष यात फरक आहे, असंही ते म्हणाले. आमदार म्हणजे पक्ष नव्हेत, असं म्हणतानाच राऊतांनी शिंदे यांना टोला लगावलाय.

बंडाची संपूर्ण कथा, थोड्याच वेळात…

मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर आता ते मातोश्री इथं पुन्हा राहायला आलेत. त्यानंतर आता आज शिंदे गटातून परतलेले दोन शिवसेना आमदार पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषेदत कैलाश पाटील आणि नितीन देशमुख संबोधित करतील. या पत्रकार परिषदेत, आमदारांना नेमकं कसं घेऊन जाण्यात आलं? याची संपूर्ण कथा सांगितली जाणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

संख्याबळाचं काय?

एकनाथ शिंदे यांना शिवसेनावर दावा करण्यासाठी दोन तृतीयांश शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. याचाच अर्थ शिवसेनेच्या 55 पैकी 37 आमदारांचा पाठिंबा मिळाला, तर ते शिवसेनेवर दावा ठोकू शकतात. आपल्यासोबत असलेलीच खरी शिवसेना आहे, असा दावा ते करु शकतात. बुधवार आणि गुरवार या दोन दिवसांत एकनाथ शिंदेच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्याही वाढली आहे. काल-परवापर्यंत जे आमदार मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत होते, ते आमदार अचानक शिंदेसोबत गुवाहाटीत दाखल झालेत. त्यामुळे इकडे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या समोरची आव्हानंही वाढली आहेत.

बंडानंतर एकनाथ शिंदे गट मजबूत!

एकनाथ शिंदे – 47 भाजप – 106 अपक्ष – 13 एकूण – 166

बंडानंतरची महाविकास आघाडीची अवस्था

शिवसेना – 14 राष्ट्रवादी – 53 काँग्रेस – 44 अपक्ष – 10 एकूण – 121

वाचा लाईव्ह अपडेट्स :

Eknath Shinde News, Uddhav Thackeray LIVE : शिवसेनेचे आणखी 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल, हॉटेलची सुरक्षा वाढवली

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.