आधी फडणवीस म्हणाले फासा आम्हीच पलटणार, आता संजय राऊत म्हणतात…
"आम्हीच फासा पलटवू, शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल" असं सूचक भाष्य फडणवीसांनी केलं होतं. (Sanjay Raut Devendra Fadnavis )
मुंबई : “फासा आम्हीच पलटणार, शिडीशिवाय फासा पलटणार” असं वक्तव्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा सत्तांतर करण्याबाबत पुडी सोडली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांना मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा” असं उत्तर देत राऊतांनी अधिक भाष्य करणं टाळलं. (Sanjay Raut answers Devendra Fadnavis on hinting to change power)
राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच “आम्हीच फासा पलटवू, शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल” असं सूचक भाष्य फडणवीसांनी केलं होतं. मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
“परिवर्तन हा त्यांचा अंतर्गत प्रश्न”
दरम्यान, नाना पटोले यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका केलेली नाही, तर त्यांचं कौतुक केलंय, असं संजय राऊत यांनी अधोरेखित केलं. काँग्रेस पक्षातील संजीवनी देण्याचा उत्साह महत्त्वाचा आहे. काँग्रेस हा देशात सत्तेत नसला तरी महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे. त्यांची परंपरा, इतिहास मोठा आहे. देशात या पक्षाला नवसंजीवनी मिळावी, ही आमचीही इच्छा आहे. परिवर्तन हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले.
“तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील माहित नव्हतं”
शरद पवार म्हणाले, की विधानसभा अध्यक्षपद खुलं झालं आहे, त्यामुळे पुन्हा चर्चा होईल. सरकार स्थापन करताना पाच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद ठरलं होतं, तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील, हे कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे तीन पक्ष एकत्र निर्णय घेतील. तीन पक्षांचं बहुमत असलेलं हे सरकार आहे, त्यामुळे हा प्रकार टाळायला हवा होता, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
संबंधित बातम्या :
फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांनी दिले सत्तांतराचे संकेत
काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षांसाठी, एका वर्षात राजीनामा देऊन निवडणुकांसाठी नाही : सामना
(Sanjay Raut answers Devendra Fadnavis on hinting to change power)