किरकोळ चोऱ्यामाऱ्या करुन राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत, अजितदादांसाठी राऊतांची जोरदार बॅटिंग

पहाटेच्या शपथविधीनंतर अडचणीत आलेल्या अजित पवारांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यानेही आतापर्यंत एवढी जोरदार बॅटिंग केली नसेल तेवढी धुव्वाधार बॅटिंग संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे. | Sanjay Raut Ajit pawar

किरकोळ चोऱ्यामाऱ्या करुन राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत, अजितदादांसाठी राऊतांची जोरदार बॅटिंग
अजित पवार आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 9:00 AM

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra fadanvis) साथीने अजितदादांचा (Ajit pawar) पहाटेचा तो शपथविधी, राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार, अजितदादांकडे असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची यादी, सत्तास्थापनेच्या काळातलं ते सगळं राजकीय थरारनाट्य, त्यानंतर काही दिवस अडचणीत आलेले अजित पवार, हे सगळ्या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलं. गेले काही दिवस याच मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी अजितदादांवर टीकेची झोड उठवलीय. अजितदादा चंद्रकांतदादांना प्रत्येक पत्रकार परिषदेत जशास तसं उच्चर देतायत. पण आता अजितदादांच्या सोबतीला आलेत त्यांच्या मित्रपक्षांचे प्रमुख नेते, युतीचे शिल्पकार खासदार संजय राऊत (Sanjay Raut)… पहाटेच्या शपथविधीनंतर अडचणीत आलेल्या अजित पवारांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यानेही आतापर्यंत एवढी जोरदार बॅटिंग केली नसेल तेवढी धुव्वाधार बॅटिंग संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे. राऊतांच्या बॅटिंगनंतर आता चंद्रकांत पाटील तशाच आक्रमक पद्धतीने उत्तर देतात ती डिफेन्सिव्ह खेळतात हे पहावं लागेल. तत्पूर्वी राऊतांनी अजित पवारांसाठी कशी बॅटिंग केलीय, हे आपण पाहूया…!   (Sanjay Raut Batting For Ajit Pawar in Saamana Editorial and Criticized  Chandrakant Patil)

किरकोळ चोऱ्यामाऱ्या करून राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजितदादा नाहीत

किरकोळ चोऱ्यामाऱ्या करून राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत. पहाटे त्यांनी एक प्रयोग केला तो फसला. असे प्रयोग देशाच्या राजकारणात अधूनमधून होतच असतात. दुसरे असे की, अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. अजित पवारांनी पत्र चोरले हे अनैतिक असल्याचा पाटलांचा दावा मान्य केला तरी ते चोरलेले पत्र भाजप नेत्यांनी स्वीकारणे, त्यावर विश्वास ठेवून ते राज्यपालांकडे सुपूर्द करणे, त्या चोरलेल्या पत्राच्या आधारे राजभवनात सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हे फक्त अनैतिकच नाही, तर बेकायदेशीरदेखील ठरते.

चंद्रकांत पाटलांचं ‘आ बैल मुझे मार…!

अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी ‘आ बैल मुझे मार’ असेच केले आहे. अजित दादा मोठया पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’ चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा . एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला.

पाटलांचा पत्रचोरीचा स्फोट म्हणजे पोरखेळ

चंद्रकांत पाटील यांनी आता असा स्फोट केला आहे की, पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांनी जे 54 आमदारांच्या सहीचे पत्र भाजप नेत्यांच्या माध्यमातून राज्यपालांना सादर केले तो एक मोठा घोटाळा आहे. हे पत्र अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरले. हे असे पत्र चोरणे नैतिक की अनैतिक, असा प्रश्न पाटलांनी विचारला आहे. पाटलांचा पत्रचोरीचा स्फोट म्हणजे पोरखेळ आहे.

पाटलांनी दाखवून दिलं, भविष्यात मोठे राजकारण करण्यास आपण सक्षम नाही!

राजकारणात व युद्धात सर्व माफ असते. चढाई करून विजय मिळवायचा असतो. त्यासाठी अनेकदा नैतिक-अनैतिकेच्या पलीकडे जाऊन कार्य सिद्धीस न्यायचे असते. अजित पवारांचे ते पत्र हा भाजप व अजित पवारांतील गुप्त करार असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत गुप्तच राहायला हवा होता. पण पाटलांनी अकारण भांडाफोड करून आपण भविष्यात मोठे राजकारण करण्यास सक्षम नसल्याचे दाखवून दिले.

राजकारणात व युद्धात सर्व माफ असते. चढाई करून विजय मिळवायचा असतो. त्यासाठी अनेकदा नैतिक-अनैतिकेच्या पलीकडे जाऊन कार्य सिद्धीस न्यायचे असते. अजित पवारांचे ते पत्र हा भाजप व अजित पवारांतील गुप्त करार असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत गुप्तच राहायला हवा होता. पण पाटलांनी अकारण भांडाफोड करून आपण भविष्यात मोठे राजकारण करण्यास सक्षम नसल्याचे दाखवून दिले.

(Sanjay Raut Batting For Ajit Pawar in Saamana Editorial and Criticized  Chandrakant Patil)

हे ही वाचा :

“अजितदादा पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी भाजपची कोण-कोण लोकं होती? खुलासा व्हायलाच हवा”

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.