मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अडचणीत आणणारी बातमी समोर आली आहे संजय राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील वाकोला पोलीस (Vakola Police) ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिपच्या (Audio Clip) आधारे पोलिसांनी संजय राऊत आणि विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय कलम 507 अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेनं अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. याबाबत एक कथित ऑडिओ क्लिपही समोर आलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत आणि या महिलेचं संभाषण असल्याचं सांगण्यात येत आहे. राऊत यांनी बलात्कार आणि हत्येची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेनं केलाय. याबाबत वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेनं ती ऑडिओ क्लिपही पोलिसांना दिलीय. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय.
संजय राऊत यांच्या ऑडिओ क्लिपची पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. महिलेची तक्रार दाखल झाली असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आल्याची माहिती मिळतेय.
‘*** *** आता फोन ठेव. *** फोन ठेव. शहाणपणा करायचा नाही. गप ए ***, तुझ्या *** *** तू मला शिकवशील. मी ऐकून घेतोय म्हणून *** तू मला काय समजतेय? मी सांगतोय… माझ्या नादाला लागायचं नाही, मी परत सांगतोय. तू हे रेकॉर्ड कर आणि पोलिसांत दे *** *** माझी कॉलर पकडते का, तुझी लायकी आहे *** *** काही दिवसांत तुझी लायकी दाखवेन तुला’.