शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?, संजय राऊतांचा विरोधकांना जमालगोटा
सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on NCP Sharad Pawar Maha Vikas Aaghadi Government)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेतत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Sanjay Raut on NCP Sharad Pawar Maha Vikas Aaghadi Government)
शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतात असाच आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असे संजय राऊत म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार राहिले नाही. तर त्यांना पण अभ्यास करता आला असता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लक्ष घालावं. यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मोदींकडे या प्रश्न घेऊन जावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात जाऊ, असेही संजय राऊत म्हणाले.
मुळात महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणे हा राज्याचा अपमान आहे. दुर्देवाने आज जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी मनोवृत्ती सध्या देशात तयार होते आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.
बिहारच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. बिहार निवडणुकीत जर काही गडबड झाली नाही. तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको, असेही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात जे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापुढे फार मोठे आव्हान आहे. विरोधी पक्षाचे ते काम आहे. महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे आणि चांगल्या विरोधी पक्षाचे स्वागत केलं पाहिजे. एक उत्तम विरोधी पक्ष राहिला पाहिजे. त्याशिवाय राज्य आणि देश पुढे जाऊ शकत नाही, असेही संजय राऊतांनी म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी आरोग्यविषयक संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केलं”
मधला काळ हा संकटाचा होता. कोरोनाची लढाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली लढली होती. इतर राज्यांमध्ये व्यवस्था त्यांच्या खिजगणतीसही नाही. या मुख्यमंत्र्यांनी आरोग्यविषयक संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केलं, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
एकेकाळ वर्षाभरापूर्वी पत्रकारांना रोज 10 वाजता भेटायचो. महाराष्ट्राचा राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे आहे. हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही असं जरी काही लोकांना वाटत होतं पण ते कसं शक्य आहे. निवडणुकीआधी मला हे सरकार असचं येईल असच वाटत होतं. सरकार पूर्ण ताकदीने चालेल, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on NCP Sharad Pawar Maha Vikas Aaghadi Government)
संबंधित बातम्या :