राऊत म्हणाले, ‘आगे बढो’, धनंजय मुंडे म्हणाले, ‘बहिणीला उदंड आयुष्य लाभो’ तर भाच्याकडून आत्याला खास शुभेच्छा

महाराष्ट्राच्या धडाडीच्या महिला नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हुशार चेहरा, राजधानी दिल्लीत आपल्या कर्तृत्वाने संसदभवन गाजवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. (Supriya Sule Birthday)

राऊत म्हणाले, 'आगे बढो', धनंजय मुंडे म्हणाले, 'बहिणीला उदंड आयुष्य लाभो' तर भाच्याकडून आत्याला खास शुभेच्छा
सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील नेते आज त्यांना शुभेच्छा देत आहेत.
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 12:21 PM

मुंबई :  महाराष्ट्राच्या धडाडीच्या महिला नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हुशार चेहरा, राजधानी दिल्लीत आपल्या कर्तृत्वाने संसदभवन गाजवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील नेते त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या खास त्यांच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. तर धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांनीही सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाला खास ट्विट करत त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे. (Sanjay Raut, Dhananjay Munde And Rohit Pawar Wish Supriya Sule Birthday)

ताकदीचा राजकीय वारसा असूनही सदैव विनम्र

संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरचा आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ताकदीचा राजकीय वारसा असुनही सदैव विनम्र असलेल्या मुलगी, आई, बहीण,पत्नी अशा यशस्वी भूमिका वठवून संसदपटू म्हणून तळपणाऱ्या सुप्रिया सुळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आगे बढो! जय महाराष्ट्र!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

मोठ्या बहिणीला उदंड आयुष्य लाभो

आमच्या जेष्ठ भगिनी, राष्ट्रवादीच्या नेत्या, बारामतीच्या लोकप्रिय खासदार, संसदरत्न आदरणीय सुप्रिया ताई, आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. जनसेवेसाठी आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आमच्या प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

भाच्याकडून आत्याला खास शुभेच्छा

संसदेत महाराष्ट्राशी संबंधित प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करुन तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘संसद महारत्न’ खासदार सुप्रिया सुळे ताई (आत्या) आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभो, ही प्रार्थना!, अशा शब्दात रोहित पवार यांनी आत्या सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

(Sanjay Raut, Dhananjay Munde And Rohit Pawar Wish Supriya Sule Birthday)

हे ही वाचा :

थोरातांची कन्या म्हणाली, तुमच्या भाषेवरुन संस्काराची ओळख होते, आता पडळकरांचं प्रत्युत्तर

रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, शरद पवारांच्या दिल्ली बैठकीवर पडळकरांची जहरी टीका

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.