ED Arrested Sanjay Raut : ‘राजा’ का संदेश साफ़ है म्हणत संजय राऊतांच्या अटकेवरून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा  

| Updated on: Aug 03, 2022 | 12:27 PM

ED Arrested Sanjay Raut Live : राऊतांच्या ईडी चौकशीशी संबंधित सगळ्या माहिती पाहा एका क्लिकवर

ED Arrested Sanjay Raut : ‘राजा’ का संदेश साफ़ है म्हणत संजय राऊतांच्या अटकेवरून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा  
संजय राऊतांच्या घरातून सापडलेल्या 11 लाख 50 हजार रुपयांचा हिशोबImage Credit source: tv9

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीचं पथक (ED Raid) दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. 10 ईडीचे अधिकारी राऊतांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन (Assembly Session) असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र कालच्या धाडसत्रानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. कोर्टाने राऊतांना तीन दिवसांची ईडी कोठडी दिली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Aug 2022 08:42 PM (IST)

    ‘राजा’ का संदेश साफ़ है म्हणत संजय राऊतांच्या अटकेवरून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा  

  • 01 Aug 2022 08:35 PM (IST)

    आम्हाला संजय राऊतांचा अभिमान, केंद्र सरकारला भीक घालणार नाही – विनायक राऊत

    संजय राऊत यांच्या अटकेवरून विनायक राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघात

    बेईमानीचा अंत होऊन, प्रमाणिकपणाचा विजय होईल – राऊत

    आम्हाला संजय राऊत यांचा अभिमान आहे  – राऊत

    केंद्र सरकारला भीक घालणार नाही – राऊत

    राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा डाव – राऊत

    संपूर्ण महाराष्ट्र  संजय राऊतांच्या पाठीमागे – विनायक राऊत

  • 01 Aug 2022 07:53 PM (IST)

    आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास – सुनील राऊत

    आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास

    संजय राऊत प्रकरणावर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया

    राज्यात सध्या ड्रामेबाजी सुरूये

    संजय राऊत यांचा आवाज बंद होणे शक्य नाही

    सुनील राऊत यांचा भाजपाला टोला

  • 01 Aug 2022 07:35 PM (IST)

    ‘भाजपाच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही’

    शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची ट्विट करत भाजपावर टिका

    भाजपाच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना कधीच संपणार नाही

    उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत, की भाजपाला शिवसेना संपवायची आहे

    हेच आज श्री. नड्डा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले

    अरविंद सावंत यांचा ट्विटच्या माध्यमातून भाजपावर निशाणा

  • 01 Aug 2022 07:04 PM (IST)

    संजय राऊत यांच्या अटकेशी आमचा काहीही संबंध नाही, पत्राचाळमधील नागरिकांची भूमिका

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्रचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली आहे, मात्र हे सर्व राजकारण असून, या राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही असे मत पत्राचाळमधील रहिवाशांनी घेतली आहे. आमचे घर चांगले बांधले जावे हीच आमची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

  • 01 Aug 2022 05:52 PM (IST)

    गडचिरोलीत शिवसैनिक आक्रमक, राऊतांच्या अटकेचा निषेध

    गडचिरोलीत शिवसैनिक आक्रमक

    शिवसैनिकांकडून  राऊतांच्या अटकेचा निषेध

    शिवसैनिकांकडून रास्तारोक आंदोलन

    जवळपास 1 तास देसाईगंज -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर वागतूक ठप्प

  • 01 Aug 2022 05:14 PM (IST)

    शिंदे गटातील खासदार भावना गवळी Live

    ईडी एका विशिष्ठ पद्धतीने काम करत आहे. त्यात राऊतांचा दोष काही नसेल तर सुटतील. दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली आहे.

    मी थेट देशाच्या पंतप्रधानांना भेटली आणि माझी व्यथा सांगितली. मी खासदार आहे. मला अधिकार आहे. युतीतही आम्ही भाजप आणि सेना म्हणून लढलो, त्या अर्थानेही मला अधिकार आहे. आणि आता मला कोर्टाने क्लीन चिट दिली आहे. या लढाईत ज्यांचं सहकार्य लागलं ते मी घेतलं आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 01 Aug 2022 05:10 PM (IST)

    संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी 

    यवतमाळ शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळ येथील दत्त चौक येथे शेकडो शिवसैनिकांनी जोरदार यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. असून भाजप विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे. संजय राऊतांवर करण्यात आलेली कारवाई ही अन्याय असल्याचं शिवसैनिकांनी म्हटले आहे. भाजप ईडीच्या माध्यमातून सेनेच्याच नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला आहे.यावेळी आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड,  पराग पिंगळेंसह शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

    पाहा व्हिडिओ

  • 01 Aug 2022 04:46 PM (IST)

    राऊतांच्या कोठडीनंतरच्या प्रतिक्रिया

    संदीप राऊत यांनी सांगितले संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने तीन दिवसाची इडी कस्टडी दिली आहे. भाजपा कडून सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे. ईडीच्या दबावाखाली संजय राऊत झुकले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. काही लोकांनी पेढे वाटले. मात्र आम्ही न्यायालयीन लडाई लडणार आहे आहोत.

    पाहा व्हिडिओ

  • 01 Aug 2022 04:42 PM (IST)

    शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

    संजय राऊत यांना 7 दिवसांऐवजी 3 दिवसांची कोठडी मिळाली याचा अर्थ ते निर्दोष सिद्ध झाले असा होत नाही, संजय राऊत 8 ते 9 तास चौकशी करून अटक केली आहे, त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना नक्कीच काहीतरी हाती लागले असणार, त्यामुळे शिवसेनेने आता काहीही आरोप न करता संजय राऊतांना कसं वाचवायचे ते पाहावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 01 Aug 2022 04:31 PM (IST)

    संजय राऊतांच्या भावाची प्रतिक्रिया

    मला विश्वास आहे की त्यांनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. न्याय  व्यवस्था आपलं काम चोख करेल आणि संजय राऊतांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया सुनिल राऊत यांनी दिली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 01 Aug 2022 04:30 PM (IST)

    अमरावतीतून राणा यांची पुन्हा ठाकरेंवर टीका

    उद्धव ठाकरे यांनी आज देशाची चिंता व्यक्त केली.परंतु अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्र सांभाळू शकले नाही. आणि तुम्ही देशाची चिंता करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही अडीच वर्ष पूर्णपणे फेल झाले. बाळासाहेबांच्या विचाराचे हिंदूत्व प्रत्येक शिवसैनिकात होते पण तुम्ही ते काँग्रेसच्या दारात नेऊन ठेवले. बाळासाहेबांच्या विचारांना दूर ठेवून स्वतःसाठी काँग्रेससोबत आघाडी केली. बाळासाहेबांचे हिंदूत्व टिकवण्याची जबाबदारी आता एकनाथ शिंदेंवर आहे व त्यांच्यासोबत असलेल्या 50 आमदारांवर आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 01 Aug 2022 04:14 PM (IST)

    Sanjay Raut Ed Custody : शिंदे गटातील रामदास कदम Live

    संजय राऊतांनी असं बोलणं शोभत नाही, अनेक लोकांना आधी अटक झाली आहे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना अटक झालीच ना, संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत. ते लढाई जिंकूण येतील, असा विश्वास वाटतो त्यांना.

    जेपी नड्डा यांच्या वक्तव्यासी मी सहमत नाही, अशी प्रतिक्रियाही रामदास कदम यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. जे सर्व लोक गेली आहेत ते गुलाम आहेत का? रामदास कमद यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल.

    गुलाम कोण कोणाचं होतं हे बघा. संजय राऊतांनी कधीही राष्ट्रवादीने 57 टक्के निधी नेला त्यावर राऊतांनी कधी मुलाखत दिली का. तुम्ही गुलाम राष्ट्रवादीचे आहात का हा विचार केला पाहिजे. आधी संजय राऊतांना नोटीस आले तेव्हा पवार मोदींना भेटले, कोण कुणाच्या मांडीवर बसलंय हेही महाराष्ट्राने बघितलं आहे.

    आम्ही पाच दशकं पक्षात काढली तर आमची हाकालपट्टी केली. त्यांना आता बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची गरज उरली नाही. बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करू दिली नसती. तेव्हा मी त्यांना चुकीची युती होतेय हे उद्धव ठाकरे यांना सांगितलं.

    भाजपला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री व्हायला उद्धव ठाकरे तयार झाले होते. मात्र तिथं राऊत आले आणि फिस्कटलं.

  • 01 Aug 2022 03:52 PM (IST)

    Sanjay Raut ED Hearing : संजय राऊतांना तीन दिवसांची ईडी कोठडी

    संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

    राऊतांना घरचे जेवण आणि औषधं दिली जाणार

    राऊतांना हृदयाचा त्रास असल्याने रात्री उशिरापर्यंत चौकशी केली जाणार नाही

    सकाळी एक तास वकिलांशी चर्चा करु शकतात

  • 01 Aug 2022 03:43 PM (IST)

    Sanjay Raut ED Hearing : संजय राऊत प्रकरणातील सुनावणी सुरु

    दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाले

    थोड्याच वेळात निकाल येईल

    कोर्टानं ऑर्डर देण्यास सुरुवात केली

  • 01 Aug 2022 03:24 PM (IST)

    Sanjay Raut ED Hearing : संजय राऊत प्रकरणातील सुनावणी सुरु

    संजय राऊत प्रकरणातील सुनावणी सुरु

    आठ दिवसांच्या कोठडीची ईडीकडून मागणी

    संजय राऊत तपासला सहकार्य करत नाहीत – ईडी

    संजय राऊतांकडून साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न – ईडी

    राऊतांना घरचे जेवण आणि औषधं द्यायला हरकत नाही – ईडी

    राऊतांना राजकीय द्वेषापोटी अटक : अशोक मुंदरगी

    राज्यातील सत्ता बदल्यामुळे राऊतांवर कारवाई – मुंदरगी

    कोठडीत असताना राऊतांना वकिलांशी सल्लामसलतीशी परवानगी द्यावी – मुंदरगी

  • 01 Aug 2022 03:19 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला

    प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात कोश्यारींच्या उद्गारातून मी राज्यपाल हा शब्द मुद्दाम वापरत नाही

    कोश्यारींच्या उद्गारातून झाली आहे

    आज नड्डा म्हणाले पक्ष संपतील, म्हणजे प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची

    हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची

    राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान भेसूरपणे करताना दिसत नाही

    तेव्हा आणीबाणीला देशाला अनुशासन पाहिजे त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता

    तेव्हा जेव्हा राजकारणाशी संबंध नव्हता

    पुल देशपांडे दुर्गा भागवत साहित्यिक विचारवंत यांनी लोकशाहीच्या होमकुंडात उडी मारली होती

    लोकशाही जिवंत ठेवली होती

    राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर तुमचं ऐक्य अवलंबून नसतं

    आता वेळ गेलेली नाही, त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे

    जनतेनेही एकत्र आलं पाहिजे

    एक दलाल बोलला यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात

    पण माझ्या सोबत दमदार आणि वफादार आहेत

  • 01 Aug 2022 03:07 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    संजय राऊतांबद्दल मला नक्कीच अभिमान आहे

    संजय माझा जुना मित्र आहे

    मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो

    गुन्हा काय संजयचा, पत्रकार आहे, शिवसैनिक आहे, निर्भिड आहे

    जे पटत नाही ते बोलतोय, मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्याचं वाक्य चांगलं आहे

    तोही शरण जाऊ शकला असता

    जे शरण झाले हमाममध्ये गेले आंघोळीला गेले

    जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात

    फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल

    त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल

    केवळ सोबत येतील ते नाही तर जे गुलाम होतील ते काही काळ आपले

    काम संपल्यावर नवीन गुलाम येतील, हे गुलाम जातील

    गुलामगिरीकडे वाटचाल आहे,  त्याचा निषेध केला पाहिजे

    राऊतांबद्दल मला अभिमान आहे

    ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत, ठिक आहे

    राजकारण म्हटलं की त्याची बुद्धीबळाशी तुलना करतो

    आजच्या राजकारणात बुद्धिचा नाही बळाचा वापर केला जात आहे

    नुसते बळ तुमच्याकडे आहे

    म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असला तर दिवस सर्वदा सारखे नसतात

    दिवस फिरतात, दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा

  • 01 Aug 2022 02:53 PM (IST)

    छगन भुजबळ ऑन राऊत कारवाई

    राऊत यांच्यावर कारवाई झाली, फारच दुःखद आहे

    ज्यांच्यावर कारवाई होते ते फारच अडचणीचं होतं

    घरदार उद्ध्वस्त होतं

  • 01 Aug 2022 02:33 PM (IST)

    मुंबई

    संजय राऊत यांना विशेष कोर्टात हजर करणार

    तीन वाजता सुनावणीला सुरुवात होणार

    ईडीकडून संजय राऊत यांच्या कोठडीची मागणी करणार

  • 01 Aug 2022 02:32 PM (IST)

    मुंबई

    ईडीच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली

    संजय राऊत यांची सुमारे 40 मिनिटे वैद्यकीय तपासणी झाली

    संजय राऊत डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर येताच रुग्णालयातून शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली

    त्यानंतर संजय राऊत यांनी हात हलवून कार्यकर्त्यांचे आभार मानले

    संजय राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीपूर्वी रुग्णालयाच्या आत आणि बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

    कोणतीही मीडिया किंवा बाहेरील व्यक्ती रुग्णालयात येऊ नये यासाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती

    TV9 ने हॉस्पिटलमधील संजय राऊत यांचे एक फुटेज कॅप्चर केले आहे, ज्यामध्ये संजय राउत हसत हसत डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडताना, हात वर करून कार्यकर्त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत

  • 01 Aug 2022 02:06 PM (IST)

    Ajit Pawar : सुडबुद्धीने कोणावरती ही कारवाई करु नये – अजित पवार

    राज्यात कोणचंही सरकार असू द्या

    सुडबुद्धीने कोणावरती ही कारवाई करु नये,

    सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे दिसतं आहे

  • 01 Aug 2022 02:01 PM (IST)

    ED Arrested Sanjay Raut | राऊत हे ठाकरेंचा एक सच्चा ढाण्या वाघ आहेत-कार्यकर्त्या महिलेच्या भावना

    ED Arrested Sanjay Raut | राऊत हे ठाकरेंचा एक सच्चा ढाण्या वाघ आहेत-कार्यकर्त्या महिलेच्या भावना

  • 01 Aug 2022 01:58 PM (IST)

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे चार वाजता मातोश्रीवरती पत्रकार परिषद घेणार

    उद्धव ठाकरे चार वाजता मातोश्रीवरती पत्रकार परिषद घेणार

    आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे

    संजय राऊत यांच्या अटकेनंतर पहिली पत्रकार परिषद

  • 01 Aug 2022 01:52 PM (IST)

    uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

    उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

  • 01 Aug 2022 01:48 PM (IST)

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे राऊत कुटुंबाच्या भेटीला

    काल घरी चौकशी कशी पद्धतीने झाली.

    त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी काय त्रास दिला का ?

    उद्धव ठाकरे यांच्यासोबत अरविंद सावंत देखील आहेत

    संजय राऊत यांच्या निवासाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे

    संजय राऊत यांचं कुटुंब घरी आहे

  • 01 Aug 2022 01:39 PM (IST)

    sanjay raut : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या ईडीने केलेल्या अटकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे

    चंद्रपूर :- शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या ईडीने केलेल्या अटकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    संजय राऊत हे अडीच वर्ष खलनायकी भूमिकेत होते. त्यांनी कधीही महाराष्ट्राचे- शेतकऱ्यांचे- वंचितांचे प्रश्न मांडले नाहीत.

    त्याऐवजी आमदारांना रेडे म्हणत महिलेलाही अपशब्द वापरले. 70 सेकंदात 70 शिव्या देण्याचा विक्रम ज्यांच्या नावे आहे अशांनी महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी शेतकरी आंदोलनातील टीकैत त्यांचीही गळाभेट घेतली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत असा भाव त्यांना होता.

    मुंबईतुन मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत असून कधी पत्रा चाळवासियांचे दुःखी समजून घेतले पाहिजे असेही मुनगंटीवार म्हणाले.

    मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी मेट्रो महत्त्वाची होती. ती देखील यांनी अडवली.

    सरकारी वकीलाकरवी कट रचून विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक “ही तर श्रींची इच्छा” असेही मुनगंटीवार म्हणाले.

  • 01 Aug 2022 01:15 PM (IST)

    sanjay raut : संजय राऊत यांनी गरजेची कागदपत्रे ईडीला द्यावी – दीपक केसरकर

    संजय राऊत यांनी गरजेची कागदपत्रे ईडीला द्यावी – दीपक केसरकर

    संजय राऊत यांच्यावरती अजून कारवाई झालेली नाही

    आदित्य ठृाकरे यांनी जरूर रॅली काढावी

  • 01 Aug 2022 12:55 PM (IST)

    Sanjay Raut live : संजय राऊत यांच्या अटकेवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची प्रतिक्रिया

    संजय राऊत पूर्णपणे दोषी आहेत. हा तपास प्रदीर्घ काळापासून सुरू असून अनेक कारवाई आणि चौकशीही झाल्या आहेत. जेव्हा जेव्हा तपास यंत्रणा एखाद्याला ताब्यात घेते तेव्हा काहीतरी घडते. संजय राऊत यांच्या अटकेवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची प्रतिक्रिया

  • 01 Aug 2022 12:54 PM (IST)

    Sanjay Raut : ईडीने अटक केल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक

    रात्री संजय राऊत याना ईडीने अटक केल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून वाडा तालुक्यात बाळासाहेब ठाकरे  व आनंद दिघे यांच्या प्रतिमेला हार घालून शिवसैनिकांनी ईडीच्या विरोधात या हुकूमशाहीचे करायचे काय खालती टोके वरती पाय ,उद्धव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है,राऊत साहेब आगे  बडो हम तुम्हारे साथ  है अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला तसेच महामहिम राज्यपाल कोशारी यांनी जे व्यक्तव्य केले त्याचा सुधा निषेध व्यक्त करण्यात आला

  • 01 Aug 2022 12:53 PM (IST)

    Suhas kande : सबळ पुराव्यांच्या आधारेच संजय राऊतांना अटक झाली असावी – आमदार सुहास अण्णा कांदे

    सबळ पुराव्यांच्या आधारेच संजय राऊतांना अटक झाली असावी…

    केंद्राच्या आदेशाने जर ED चे काम सुरू राहिले असते तर सर्वांवरच ED लागली असती..

    स्वाती पटणकरांनी देखील सबळ पुरावे दिले आहेत…

    100 कोटींच्या एफएसआय विकल्याच्या आरोपांवरून हि कारवाई झाली असावी…

    Ed हि चौकशी करूनच अटक करत असते…

    2 वेळा समन्स दिण्यात आल्यानंतर हि राऊत हजर न झाल्याने हि कारवाई करण्यात आली ..

    राऊत यांच्याकडे पक्षाचे पैसे असावेत…

    मुख्यमंत्री दिल्लीला अनेकदा गेले असून त्यांच्या रात्री जाण्याचे तर्क वितर्क लावू नयेत..

  • 01 Aug 2022 12:47 PM (IST)

    sanjay raut live news : ईडीने केलेल्या कारवाईचा संजय राऊत कांगावा करत आहेत ; शंभुराज देसाई यांचं वक्तव्य

    सातारा: ED ने केलेल्या कारवाई चा संजय राऊत कांगावा करतायेत ; शंभुराज देसाईंच वक्तव्य

    पुरावे घेवुनच संजय राऊत यांच्यावर कारवाई झालीये

    ED स्वायत्त संस्था आहे या कामात कोणाचाच हस्तक्षेप नसतो

    संजय राऊत यांना कर नाही तर डर कशाला

    कारवाई झाल्यावर सगळेच म्हणतात अडकवलं गेलय असं म्हणनं हे चुकीचं आहे राऊतांचे भाऊ चुकीचं बोलतायेत

    कारवाई कशी चुकीची आहे हे अधिका-यांना पटवुन द्या ते ED चे अधिकारी तपासतील

    संजय राऊतांच्या बोलण्यानं आणि वागण्यानं गेल्या दोन वर्षात जे तयार केलय त्याचा हा परिणाम असुन त्यांनीच शिवसेना संपवलीये अशी टिका शंभुराज देसाईंनी केलीये

    राऊतांच्यावर झालेल्या कारवाईत भाजपाचा हात नाही ; शंभुराज देसाई

  • 01 Aug 2022 12:45 PM (IST)

    Sanjay Raut Arrested : ईडी संजय राऊतांच्या कोठडीची मागणी करणार?

    Sanjay Raut Arrested : ईडी संजय राऊतांच्या कोठडीची मागणी करणार?

  • 01 Aug 2022 12:44 PM (IST)

    ED Arrests Sanjay Raut | संजय राऊत यांना घेऊन ED अधिकारी मेडिकल टेस्टसाठी रवाना

    ED Arrests Sanjay Raut | संजय राऊत यांना घेऊन ED अधिकारी मेडिकल टेस्टसाठी रवाना

  • 01 Aug 2022 12:38 PM (IST)

    sanjay raut which party : राऊतांनी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं – गोपीचंद पडळकर

    – राऊतांनी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं. आमच्यावर केसेस टाकल्या- त्याला आम्ही सामोरे गेलो – तुमचं सरकार असताना अडकवणाचा प्रयत्न. तुमच्यावर वेळ येते तेव्हा तो मी नव्हेच म्हणता

    – राऊत याला अटक होणार त्याला अटक होणार हे बोलायचेच ना. कोर्टात सांगावं. चूक नाही तर घाबरायचं कारण नाही

    – दहा लाख आरोप- चिठ्ठीमध्ये काही पण लिहितां येतं. मी लिहू शकतोोशिंदे खुलासा करतील

    – अजित पवारांना शेतकऱ्यांनीच उत्तर दिलं. तुम्ही काय भुमिका घेतली सरकार जाणून आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटी घेतायत.

    – सेना त्यांच्या विचारापासून बाजुला गेलाय. असं होतं तेव्हा पक्ष संपतो नड्डा त्यामुळे बोलले असतील. सेना विचारधारेपासुन दुरावले. त्यांच्या सोबत रहायला कोणी तयार नाही

    – मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धडाक्याने काम करतायत.

  • 01 Aug 2022 12:36 PM (IST)

    Money Laundering Case : संजय राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी रुग्णालयात दाखल

    संजय राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी रुग्णालयात दाखल

    आज राऊतांचं मेडिकल होणार

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  • 01 Aug 2022 12:28 PM (IST)

    Enforcement Directorate : सगळ्या गोष्टींची लिंक या मातोश्रीवर लागत असतील तर उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा, आमदार रवी राणा यांच खळबळजनक वक्तव्य

    सगळ्या गोष्टींची लिंक या मातोश्रीवर लागत असतील तर

    उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा

    आमदार रवी राणा यांच खळबळजनक वक्तव्य

    उद्धव ठाकरेंवरही कारवाई व्हायला हवी

    काँग्रेस आणि एनसीपीसोबत संजय राऊतांनी डील केलं

    आणि डील केली म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसलेत

    मातोश्रीपर्यंत लिंक लागेल

    *ईडी ही एक सक्षम यंत्रणा आहे

    ज्या राज्यात ज्या सरकारने घोटाळे केले

    अशा लोकांवर कारवाई करते

    सात आठ महिन्यापासून चौकशी सुरू होती

    पुरावे समोर आले म्हणून ईडीनं अटक केली

    अनिल परबची चौकशी सुरू आहे

    घोटाळ्याचे फाईलही चार्ज झालेत

    काँग्रेस आणि एनसीपीकडून मोठं डील झालं आहे

    जर काही लिंक या मातोश्रीपर्यंत जाणार असतील तर चौकशी झाली पाहिजे

    संजय राऊतांवरील कारवाई राजकीय;नाही

    ईडी हे एक स्वायत्त संस्था आहे

    आता पुढच्या काळात अनिल परब गजाआड झालेले दिसतील

  • 01 Aug 2022 12:26 PM (IST)

    Shiv Sena MP Arrested : ईडीच्या दुरुपयोगाच्या आरोपावर बोलण्यास श्रीरंग बारणे यांचा नकार

    – संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली हे आपल्या माध्यमातून समजतंय,
    – मात्र मी या विषयावर जास्त काही बोलणार नाही,तो सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर भाग आहे त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही,
    – शिंदे गटाच्या आमदार खासदार टीका केली जात होती, मात्र टीका करणे लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे,
    – ईडीच्या दुरुपयोगाच्या आरोपावर बोलण्यास श्रीरंग बारणे यांचा नकार
  • 01 Aug 2022 12:24 PM (IST)

    Krupal Tumane on Sanjay Raut | संजय राऊत यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा होईल

    Krupal Tumane on Sanjay Raut | संजय राऊत यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा होईल

  • 01 Aug 2022 12:24 PM (IST)

    Sanjay Raut Arrested : नाशिकमध्ये ईडीविरोधात शिवसैनिक आक्रमक

    Sanjay Raut Arrested : नाशिकमध्ये ईडीविरोधात शिवसैनिक आक्रमक

  • 01 Aug 2022 12:15 PM (IST)

    आम्ही हनुमान चाळीसा वाचला म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं – नवनीत राणा

    मी पहिल्या दिवशीपासून सांगत आहे जे जे लोक बेइमाने आमचे सारखे लोकांना अनुमान चालीसा वाचलं म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकले आज मी ऐकले राज्यसभा मध्ये एक खासदार मेंबर ऑफ पार्लमेंट लोक राज्यसभाची ते म्हणतात की संजय राऊत यांना अटक केली म्हणून आम्हाला त्याच्यावर बोलायचं आहे.

    तर मी मेंबर पार्लमेंट होती मला तर काही कारण नसताना वन ट्वेंटी फोर एस सेशन आणि देशद्रो लावला तेव्हा कुठे होते आपले असे मेंबर ऑफ पार्लमेंट मला वाटते जे ही कारवाई झाली ते योग्यपणे आणि आपलं काम करते आणि सुप्रीम कोर्टने सुद्धा त्यांचे बाजूंनी निकाल दिलेला आहे की ईडी चे काम करत आहे ते नियम अनुस्वार काम करत आहे.

  • 01 Aug 2022 11:59 AM (IST)

    Sanjay Raut : पालघर जिल्ह्यात वाडा येथे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत

    पालघर जिल्ह्यात वाडा येथे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत

    संजय राऊत यांच्या अटके विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या फोटोला हार घालून

    घोषणाबाजी करत ईडी  विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे

  • 01 Aug 2022 11:46 AM (IST)

    Sanjay Raut : संजय राऊत यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा होईल – खा. कृपाल तुमाने

    – संजय राऊत यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा होईल
    – संजय राऊत यांनी निर्दोष आहो हे सिद्ध करावं
    – शिंदे गटात आल्यावर ईडी कारवाई थांबते असं म्हणनं चुकीचं आहे
    – तपास यंत्रणांनी एकदा कारवाई सुरु केली तर ती थांबत नाही
  • 01 Aug 2022 11:45 AM (IST)

    Sanjay Shirsat : कोणता मोठा आज उद्धव ठाकरेंच्यासोबत दिसतोय – संजय शिरसाट

    कोणता मोठा आज उद्धव ठाकरेंच्यासोबत दिसतोय

    संजय राऊत हेच होते ना ते सुध्दा आत आतमध्ये गेले आहेत

    उद्धव ठाकरे यांना त्यांनी भडकवले आहे त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे,

  • 01 Aug 2022 11:35 AM (IST)

    sanjay raut live news : संजय राऊतांच्या इतके विरोधात शिवसेना आक्रमक

    नाशिक – संजय राऊतांच्या इतके विरोधात शिवसेना आक्रमक

    सेना कार्यालया बाहेर शिवसैनिकांचे आंदोलन

    घोषणाबाजी करत ईडी आणि भाजप विरोधात घोषणाबाजी

  • 01 Aug 2022 10:41 AM (IST)

    केंद्रीय तपास यंत्रणांकडून आवाज दाबण्याचं काम-अनिल देसाई

    केंद्रीय तपास यंत्रणांकडून आवाज दाबण्याचं काम

    शिवसेना नेते अनिल देसाईंचा आरोप

    आवाज दाबण्याचा प्रयत्न

  • 01 Aug 2022 10:40 AM (IST)

    थोड्याच वेळात संजय राऊतांना मेडिकलसाठी नेणार

    थोड्याच वेळात संजय राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी नेणार

    ईडी कार्यालयाबाहेरील बंदोबस्तवाढवला

    आधी वैद्यकीय तपासणी होईल

    त्यानंतर सत्र न्यायालयात हजर केलं जाईल

  • 01 Aug 2022 10:01 AM (IST)

    संजय राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीपूर्वी जेजे रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे,

    संजय राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीपूर्वी जेजे रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे,

    रुग्णालयाच्या दोन्ही गेटवर मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, JJ रुग्णालयाच्या आजूबाजूचे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत,

    संजय राऊत यांना गोरेगाव पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  • 01 Aug 2022 09:43 AM (IST)

    देशात लोकशाही राहिले की नाही असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे – विश्वजित कदम

    देशात लोकशाही राहिले की नाही असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे ज्या हुकूमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणे चा गैर वापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो हे देशासाठी घातक आहे

  • 01 Aug 2022 09:42 AM (IST)

    शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच लोकसभा अध्यक्षांना पत्र

    शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच लोकसभा अध्यक्षांना पत्र

    केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग होतोय याविषयी संसदेत चर्चा करा

    पत्र लिहून केली मागणी ..

  • 01 Aug 2022 09:05 AM (IST)

    एकनाथ शिंदेचा भोंगा काही दिवसांनी बंद होईल – संजय राऊत

    न्यायालयीन लढाई लढणार पाहू काय होत ते

    आयोध्याचे पैसे होते काल मिळालेले ते पैसे पक्षाला जमा करायचे होते

    पत्रा चाळ बोगस प्रकरण आहे

    दादरच्या फ्लॅट साठी कर्ज घेतलं होतं

    स्वप्ना पाटकरच ते बोगस आहे, हे किरीट सोमय्याचा हाथ आहे

    संजय राउताना अटक करण्यासाठी हा प्लॅन आहे

    सगळं बोगस आहे

    सूडबुद्धीची कारवाई आहे

    नोटीस येउ द्या आम्ही बाळासाहेब यांचे सैनिक आहोत

    शिवसेनेचे भोंगे बंद होत नाही ते संजय राउत आहे मला जरी अटक केली तरी आम्ही लढत राहू

    कोण रवी राणा त्याची काय लायकी त्याने त्याचे घर संभाळाव

    संजय राऊताना अटक करण्यासाठी ही कारवाई केली गेली आहे

    एकनाथ शिंदेचा भोंगा काही दिवसांनी बंद होईल

  • 01 Aug 2022 08:50 AM (IST)

    ईडीचे पथक संजय राऊत यांची जे. जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करणार

    जेजे रुग्णालयाजवळ मुसळधार पाऊस

    शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आज ईडीचे पथक संजय राऊत यांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करणार आहे, मात्र संजय राऊत येण्यापूर्वीच जेजे रुग्णालयाभोवती जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

  • 01 Aug 2022 08:48 AM (IST)

    संजय राउत यांना अटक यापूर्वी व्हायला हवी होती – रवी राणा

    संजय राउत यांना अटक यापूर्वी व्हायला हवी होती, उद्धव ठाकरे सरकारमध्ये संजय राऊत यांच्यासह अनेक बांधकाम व्यावसायिकांनी घोटाळा केला आहे, संजय राउत यांनी पैसे घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते, आता अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

  • 01 Aug 2022 07:29 AM (IST)

    कर नाही त्याला डर कशाला पाहिजे – संजय राऊत

    आमचा स्वतःचा कधी नंदन असतं आमचं म्हणणं एवढंच असतं की ज्यांनी जे निर्दोष आहेत, त्यांनी आपले पुरावे मांडावे आणि कुठली ॲक्शन यांच्यावर ऍक्शन होत नाही. त्याच्या संदर्भात त्यांना वेगवेगळ्या नोटेशन दिलेले आहेत. परंतु याचं जे राजकीय यांच्या प्रतिक्रिया येतात त्यामध्ये योग्य नाही तर तुम्हाला वाटतं किंवा या संदर्भात आत्ताच नेतृत्व त्यांनी ऐकली साहेबांची ते मातोश्रीच्या संदर्भात गणपतीच्या दिलेली आहे अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर .यांनी दिली आहे.,

  • 01 Aug 2022 06:43 AM (IST)

    अकरा लाख पेक्षा अधिक पैसे सापडल्याने संजय राऊत यांना ताब्यात घेतले

  • 01 Aug 2022 06:40 AM (IST)

    संजय राऊतांना मध्यरात्री अटक

  • 01 Aug 2022 06:36 AM (IST)

    संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव होते याची माहिती मला नाही

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन संजय राऊतांच्या घरातील रक्कम सापडली :

    ( प्रश्न : संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या रकमेवर आपले नाव आहे. आपल्याला गुंतवण्याचा प्रयत्न आहे?)

    – संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव होते याची माहिती मला नाही. त्याची माहिती संजय राऊतच देऊ शकतात.

    – अशा फालतू गोष्टीला मी घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला असं संजय राऊत म्हणत होते.

    – ते म्हणत होते की माझी काही चूक नाही मी काहीच केले नाही. मग आता दूध का दूध पाणी का पाणी होईल. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे.

    – ते आत गेलेत, पण ते चौकशीसाठी गेलेत. तुम्ही काय त्यांना आत घालवायला लागले की काय.

    – संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल आणि यामधून सत्य बाहेर येईल.

  • 31 Jul 2022 10:11 PM (IST)

    संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाई वरून अमरावतीत शिवसेना आक्रमक

    अमरावतीत शिवसेनेच्या फलकावरून राज्यपाल आणि ईडीवर जोरदार टीका

    अमरावती मधील गाडगे नगर शाखेच्या फलकावर पागल राज्यपाल, कुत्री ईडी अस उल्लेख..

  • 31 Jul 2022 08:58 PM (IST)

    भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विट

    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 08:22 PM (IST)

    संजय राऊतांवरील कारवाईच्या निषेधार्थ जळगावात शिवसेनेच्या वतीने निदर्शने

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने आज ताब्यात घेतलं आहे. ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ जळगाव शिवसेना महानगरच्या वतीने महापालिकेसमोर काळ्या फिती लावून जोरदार निदर्शने करण्यात आली.
  • 31 Jul 2022 07:50 PM (IST)

    संजय राऊत चौकशी प्रकरणात मोठी अपडेट

    संजय राऊत यांच्या वरून ईडीला 11 लाख 50 हजार रुपये सापडले आहेत आणि ते ईडीने जप्त केले आहेत अशी माहिती समोर आलेले आहे, त्यामुळे राऊतांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • 31 Jul 2022 07:18 PM (IST)

    सुनिला राऊत यांची प्रतिक्रिया

    माझ्या आईचं वय 84 आहे. माझ्याही डोळ्यातही अश्रू आहेत. आई माझीही कट्टर शिवसैनिक आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक माणूस ठाकरेंसोबत राहणार, या गोष्टींना आम्ही भीक घालणार नाही, या गद्दारांसमोर आम्ही झुकणार नाही.

    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 07:14 PM (IST)

    विक्रांत सबने, यांचे वकील संजय राऊत

    संजय राऊत यांना स्टेटमेंट रिकोर्ड करण्यासाठी आणलं आहे. अजून संजय राऊत यांना अटक करण्यात आलेली नाही. पण उशिरा रात्री पर्यंत अटक झाली तर  सांगता येत नाही. जे डॉक्युमेंट अपेक्षित होते ते सर्व डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत.
    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 06:54 PM (IST)

    राऊतांवरील कारवाईवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया

    इंग्रजांविरोधात बोलले की कारवाई व्हायची तसं झालंय. याला धक्का नाही म्हणता येणार याला दबावतंत्र म्हणता येईल जे भाजप करतय.. एखाद्या व्यक्तीचा आवाज दाबण्यासाठी हे दबावतंत्र.. ही हुकूमशाही जास्त काळ चालू शकणार नाही .. अर्जुन खोतकर म्हंटले होते की मी नाईलाजास्तव चाललो.. याचा उद्रेक होणार, याचे परिणाम केंद्र सरकारलाही भोगावे लागणार..

    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 06:37 PM (IST)

    संजय राऊतांचा मोबाईल काढून घेतला

    शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. यादरम्यानं त्यांचा मोबाईलही ईडीने काढून घेतला आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 06:33 PM (IST)

    इचलकरंजीतही शिवसैनिकांचं आक्रमक आंदोलन

    इचलकरंजी शहरातील शिवसेना आक्रमक ,संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर ed विरोधात केली निदर्शने, भाजप सरकार सूडबुद्धीने वागत आहे, भविष्यात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, शिवसैनिक आक्रमक संजय राऊत शिवसेना खंबीरपणे पाठीशी…

    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 06:30 PM (IST)

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याने धुळ्यात शिवसैनिक आक्रमक

    केंद्र सरकार व ईडीच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसैनिकांचा मुंबई आग्रा महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको…केंद्र सरकारच्या विरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी…दोन्ही बाजूचा महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा….आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 06:17 PM (IST)

    रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

    संजय राऊत यांनी आता कोर्टात जाऊन सिद्ध करावं की ते गुन्हेगार नाहीत – रावसाहेब दानवे

  • 31 Jul 2022 06:15 PM (IST)

    संजय राऊतांचे भाऊ काय म्हणाले?

    संजय राऊत बाळासाहेबांचा सैनिक आहे तो झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली आहे.

  • 31 Jul 2022 06:03 PM (IST)

    अमरावतीतही शिवसैनिक रस्त्यावर उतरले

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा अमरावतीत शिवसेना व युवासेने कडून निषेध…केंद्र सरकार व ईडीविरोधात अमरावतीत शिवसैनिकांची घोषणाबाजी..शेकडो सैनिक जमले एकत्र; शिवसेना जिंदाबादच्या शिवसैनिकांकडून घोषणा….

  • 31 Jul 2022 05:42 PM (IST)

    पुण्यात सारसबागेजवळील सावरकर पुतळ्यासमोर शिवसैनिक उतरले रस्त्यावर

    शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर पुण्यात शिवसैनिक आक्रमक, केंद्र सरकार आकसाने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप.

  • 31 Jul 2022 05:39 PM (IST)

    मला अटक करत आहे आणि मी अटक करून घेतोय-संजय राऊत

    सगळ्यांना माहिती आहे की हे काय लेव्हलचा राजकारण सुरू आहे. हे शिवसेनेला कमजोर करण्याचे प्रयत्न आहेत. ते सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे की संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मात्र संजय राऊत शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्राची बेईमानी नाही करणार, मला अटक करायला निघालेले आहेत आणि मी अटक करून घेतोय, अशी प्रतिक्रिया राऊतांनी ईडीच्या कार्यलायबाहेरून दिली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 05:35 PM (IST)

    संजय राऊत यांची ईडी कार्यालयाबाहेरून प्रतिक्रिया

    मी बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू महाराष्ट्र इतका कमजोर नाहीये आणि शिवसेना इतकी कमजोर नाहीये. विरोधकांना दाखवून देऊ शिवसेना काय आहे. हा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, अरे बेशरम लोक आहेत तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असा टोलाही राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.

  • 31 Jul 2022 05:31 PM (IST)

    संजय राऊत ईडीच्या कार्यालयात पोहोचले

    संजय राऊत ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत, मीडियाला प्रतिक्रिया देण्यासाठी संजय राऊत आले आहेत.

  • 31 Jul 2022 05:24 PM (IST)

    ईडीने ताब्यात घेतल्यानंतरच संजय राऊतांचं ट्विट

  • 31 Jul 2022 05:18 PM (IST)

    ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

    जी काय कारवाई व्हायची ती होऊ द्या मी घाबरत नाही, ही राजकीय सुडाने चाललेली कारवाई आहे, माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांचं बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो तो शिवसेनेमुळे आणि हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही. निधड्या छातीने उभा राहतो. कुणी काहीही म्हणू द्या त्यामुळे या कारवाईला सुद्धा मी निधड्या छातीने सामोरे जातोय. यातूनच महाराष्ट्राला सुद्धा बळ मिळेल राजकीय सुडाच्या कारवाया महाराष्ट्रात सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांवर फक्त त्यांनाही यातून बळ मिळणार आहे. आमच्यासारखी ही काही लोक आहेत जी न झुकता न डरता कारवाईला सामोरे जातात आणि लढाई लढतात आणि या अशा कारवाईंच्या भीतीने अनेक लोक पक्ष सोडून जातात. शरणागती पत्करतात. संजय राऊत असा नाही. मरेन पण झुकणार नाही. वाकणार नाही शिवसेना सोडणार नाही.

    कोणतीही कागदपत्र माझ्याकडे सापडलेली नाहीत. जे काय पत्राचाळ वगैरे म्हणतायेत कोणता पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे मला माहित नाही. ती चाळ कुठे आहे मला माहित नाही. तरी ठरलेलं आहे की शिवसेना मोडायची तोडायची, माझा आवाज बंद करायचा. उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचं, त्यासाठी ही कारवाई सुरू आहे. अशाने शिवसेना आणि महाराष्ट्र कमजोर होणार नाही. माझ्यावरच्या कारवाईतून शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळेल असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे.

    ईडीचे अधिकारी आपल्या महाराष्ट्रातील देशातीलच आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करायला पाहिजे, मी खासदार आहे त्यामुळे आम्हीच कायदे बनवतो. मला कायद्याचे महत्त्व कळतं,  बदल्याच्या भावनेने आणि शिवसेनेला संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावरती कारवाई सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मी जवळचा सहकारी होतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे लढण्याचे सगळे गुण आमच्या मध्ये आलेले आहेत. मी डरपोक नाही कर नाही तर डर कशाला, असा एक प्रश्न मगाशी कोणीतरी विचारला त्यांना सांगतो कर नाही आणि डरही, नाही आणि शेवटपर्यंत पक्ष सोडणार नाही.

    अनेकांना वेळ वाढवून दिला जातो अधिवेशन सुरू आहे, मात्र मला कोणतीही नोटीस न देता पहाटे ईडीच्या अधिकारी माझ्या घरी आले. माझ्या मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेलं. मात्र आम्ही लढा लढत आहोत, सर्व शिवसैनिक आमच्या सोबत आहेत.

    मी सहा महिन्यापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून माझ्यावरती कसा दबाव आणला जातो हे कळवलं होतं. हे सरकार पाडण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे आणि मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न कसा केला जाईल ही सर्व माहिती मी उपराष्ट्रपती व्यंकय नायडू यांना दिली होती आणि भविष्यामध्ये मी आत असेल किंवा बाहेर त्याची मला परवा नाही. याही पेक्षा मोठे स्फोट मी करत राहील. तेव्हा भारतीय जनता पक्षाला कळेल की लढाई काय आहे. माझ्यावरती काही आरोप नाहीयेत. आरोप खोटे आहेत, महाराष्ट्राने उठून उभा राहावं, महाराष्ट्र लेचापेचा महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, धन्यवाद जय महाराष्ट्र.

  • 31 Jul 2022 05:06 PM (IST)

    दहा तासांनंतर ईडीची छापेमारी संपली

    दादरमध्ये संजय राऊत यांच्या गार्डन कोर्ट या फ्लॅटमध्ये देखील ईडी छापेमारी केली. सकाळी 7 वाजल्यापासून ही छापेमारी करण्यास सुरुवात झाली होती, आता तब्बल 10 तासानंतर ईडीची छापेमारी संपली आहे, अधिकारी आता इमारती मधून बाहेर निघाले आहेत.

  • 31 Jul 2022 05:05 PM (IST)

    बाळासाहेब थोरात यांची संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया

    – ईडीची ही कारवाई अपेक्षितच होती

    – महाविकास आघाडीमध्ये त्यांचे मोठे योगदान

    – शिवसेनेला असे अनेक धक्के बसतायत

    – ते निर्दोष सुटतील की नाही सांगता येत नाही

    – विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी अशा कारवाया सुरू आहेत

    – ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते मात्र निर्दोष होत आहेत

    -लोकं सर्व बघातायत लक्षात ठेवा

    – लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात

  • 31 Jul 2022 05:01 PM (IST)

    संजय राऊतांना ईडी घेऊन जातानाची दृश्यं

  • 31 Jul 2022 04:55 PM (IST)

    संजय राऊतांचे भाऊ सुनिल राऊत यांची प्रतिक्रिया

    ईडीने एकही कागदपत्र दाखवलं नाही, संजय राऊतांचा जबाब घेऊ म्हणून ईडीचे अधिकारी घेऊन गेले आहेत. आम्हीही तिथेच जातोय, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांचे भाऊ सुनिल राऊत यांनी दिली आहे.

  • 31 Jul 2022 04:53 PM (IST)

    देशात भाजप नावाचं वॉशिंग पावडर – ॲड. ठाकूर

    देशात भाजप नावाचं नवीन वॉशिंग पावडर आलं असून त्यातून सर्व साफसुथरे होत आहेत, असा जोरदार टोला काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा माजी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांची सक्त वसूली संचालनालया(ED)कडून सुरू असलेल्या चौकशी संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर ॲड. यशोमती ठाकूर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

    शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक यांच्या मुंबईतील घरी सकाळी ७ वाजल्यापासून सक्त वसूली संचालनालयाकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ॲड. यशोमती ठाकूर यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ही कारवाई म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. केंद्रातील सरकार भीतीचे वातावरण निर्माण करण्याची एकही संधी सोडत नाही. इडी म्हणजे रोज कुणाच्या घरी जाऊन काहीतरी शोधणारी संस्था बनली आहे. भाजप नावाचं वॉशिंग पावडर आलं असून जे लोक सहभागी होती ते सर्व साफसुथरे होत आहेत. मात्र केंद्रीय संस्थांचे राजकीयकरण सुरू असून देशभरात दडपशाहीचे राजकारण केले जात आहे. या सर्व गोष्टींचा जाहीर निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

  • 31 Jul 2022 04:47 PM (IST)

    संजय राऊत यांना ईडी घेऊन निघाली

    संजय राऊत यांना घरातून घेऊन ईडीचे अधिकारी निघाले आहेत. संजय राऊत यांना फोर्टाच्या कार्यालयात नेणार आहेत. संजय राऊतांचं कुटुंबं टेन्शनमध्ये,

  • 31 Jul 2022 04:43 PM (IST)

    कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

    संजय राऊतांना ईडी कस्टडी, किवा न्यायालयीन कस्टडी मिळू शकते. अशी शक्यता उज्वल निकम यांना वर्तवली आहे.

  • 31 Jul 2022 04:39 PM (IST)

    ईडीविरोधात शिवसैनिक आक्रमक

    आम्ही संजय राऊतांना घेऊन जाऊ देणार नाही, डोक्यावरून गाड्या गेल्या तरी चालेल, शिवसैनिक आक्रमक

  • 31 Jul 2022 04:32 PM (IST)

    संजय राऊत यांना फोर्टमधील कार्यालयात नेणार

    पाच ते दहा मिनिटात ईडी राऊतांना घरून घेऊन जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्यावर पत्रचाळ घोटाळा प्रकरणात कारवाई होत आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 31 Jul 2022 04:30 PM (IST)

    राऊतांवरील कारवाईनंतर मनसेनं पुन्हा शिवसेनेला डिवचलं

  • 31 Jul 2022 04:10 PM (IST)

    संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्या नंतर आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया

    संजय राऊत यांना खूप आधी अटक व्हायला पाहिजे होती

    ईडीकडे संजय राऊत विरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत

    संजय राऊत दोन ते तीन वर्षे जेलमध्ये राहतील

    जेलमध्ये गेल्यावरच संजय राऊत यांचा डोकं ठिकाणावर येईल

    संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर भूकंप येईल

    संजय राऊत यांनी केले व अवैध संपत्ती कमावली ती जप्त सुद्धा ईडी करेल

  • 31 Jul 2022 03:51 PM (IST)

    तबब्ल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊतांना ED ने ताब्यात घेतले

    तबब्ल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊतांना ED ने ताब्यात घेतले आहे.

  • 31 Jul 2022 03:51 PM (IST)

    तबब्ल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊतांना ED ने ताब्यात घेतले

    तबब्ल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊतांना ED ने ताब्यात घेतले आहे. सकाळी सात वाजल्यापासून विक्रोळी येथील मैत्री निवासस्थानी हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु होता.  ईडीचे पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झाले होते.

  • 31 Jul 2022 03:25 PM (IST)

    संजय राऊतांवरील ईडीच्या धाडीनंतर नीलम गोरे यांची प्रतिक्रिया

    – आपल्याला कल्पना आहे की शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर धाडी टाकून त्यांचा तपास सुरू आहे

    – या तपासाचा निकाल जेवढा लवकर लागेल त्यावरून आपल्याला वस्तुस्थिती समजू शकेल.

    – एखादी गोष्ट तपासाधीन असल्यानंतर मी त्याच्यावर बोलणे उचित होणार नाही मात्र आमचे लोक सामोरे जात आहेत

    – अनिल परब, संजय राऊत हे सर्व नेते जी काही वस्तूस्थिती आहे ती मांडताहेत आणि तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करत आहेत

    – मात्र महाराष्ट्राबाहेर म्हणजे मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या ठिकाणी ईडीच्या किती धाडी पडताहेत याबद्दल माहिती नाही आहे

    – मात्र महाराष्ट्रात एवढ्या धाडी पडताहेत तर त्याचे निकाल जेवढे लवकर लावता येतील तेवढे बरे होईल

  • 31 Jul 2022 03:22 PM (IST)

    एकनाथ खडसे यांची संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया

    संजय राऊत यांच्यावरील ईडीची ही कारवाई राजकीय आकसापोटी होत असेल तर निषेधात आहे

    संजय राऊत यांची इडीकडून सकाळपासून चौकशी सुरू आहे

  • 31 Jul 2022 03:19 PM (IST)

    “हा तर संसदीय लोकशाहीचा ‘ ईडी ‘ घात”, संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवरून सुषमा अंधारे यांचा आरोप

    प्रत्येक वेळेला ईडीची भीती दाखवायची, चौकशी लावायची, मानसिक खच्चीकरण करायचं आणि वेगवेगळ्या मार्गाने विरोधकांना हैराण करायचं आणि मग त्याला पैल तीरावर नेण्यासाठी तयार करायचं हेच राजकारण भाजपने सुरू केल असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे. संजय राऊत यांच्या चालू असलेल्या ईडी चौकशीवर सुषमा अंधारे यांनी भाजपवर घणाघात केला आहे. हा तर आपल्या संसदीय लोकशाहीचा ईडीघात असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. जर ईडीकडे एखाद्या विरोधात पुरावे असतील तर तुम्ही त्याची सारखी चौकशी का करता त्याच्यावरती थेट कारवाई का करत नाहीत असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी ईडीला केला आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस चौकशीला बोलवता आणि समोरच्याला भाजपत येण्यासाठी संधी देता, आणि आजपर्यंत फुटलेले आमदार याच पद्धतीने उरले गेल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर केला आहे.

  • 31 Jul 2022 03:13 PM (IST)

    राऊतांवरील ईडी कावाईविरोधात शिवसेना आक्रमक

    संजय राऊत यांच्यावर ईडी कारवाई विरोधात नागपुरात शिवसेना आंदोलन सुरू होत आहे.

  • 31 Jul 2022 02:50 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मी आज सकाळी त्यांचे ट्विट पाहत होतो, मला वाटते संजय राऊत हे शिवसेनेचे लायबलिटी आहेत, त्यांनी कुठेतरी जायचे बोलले तरी कोणी घेणार नाही. तीन महिन्यांपूर्वी राज साहेब ठाकरे म्हणाले होते की, आता कॅमेऱ्यावर नको, विनंतीला बोलण्याचा प्रेक्टिस करा, आणि मला वाटते ती वेळ आली आहे,  खोटी कारवाई झाली तर कोर्टातून न्याय मिळेल, कर नाही तर का घाबरतो, राज ठाकरेही जाऊन आलो, कर नाही तर घाबरतात कशाला? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
  • 31 Jul 2022 02:48 PM (IST)

    कृपाशंकर सिंह यांची ईडी चौकशीवर प्रतिक्रिया

    संजय राऊत आणि कृपाशंकर सिंह एकदम जवळचे मित्र आहेत , सेंट्रल एजन्सी आहे त्यावर मी काही भाष्य करू शकत नाही, एजन्सी आपला काम करते लोकं आपले काम करतात,संजय राऊत हे स्वतः मजबूत आहेत, अशी प्रतिक्रिया यावर त्यांनी दिली आहे.

  • 31 Jul 2022 01:41 PM (IST)

    वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट

    ईडी चौकशी आणि अटक करणार याची संजय राऊत यांना आधीच कल्पना होती

    त्यासंदर्भात त्यांचं आपल्याशी बोलणं झालं होतं

    त्यांची मानसिक तयारी होती

    वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट

  • 31 Jul 2022 01:35 PM (IST)

    मुख्यमंत्री म्हणतात…

    चौकशी चालू आहे ना. मला नाही माहीत अटकेचं. मी काही अधिकारी नाही. ईडीची चौकशी सुरू आहे. चौकशी होऊ द्या. ते म्हणाले मी काही केलं नाही. मग कर नाही त्याला डर कशाला. चौकशी होऊ द्या. त्यातून पुढे येईलच. ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. रोज सकाळी ९ वाजता ते बोलत होते, असं शिंदे म्हणालेत.

    त्यांना कोणी भाजपमध्ये बोलावलं का, असं कोणी निमंत्रण दिलं का. मी जाहीरपणे सांगतो. ईडीच्या भीतीने कोणी आमच्याकडे येत असेल तर कृपया येऊ नका. शिवसेनकडेपण नका आणि भाजपकडेही नका. आम्हाला दबाव टाकून कुणाला घ्यायचं नाही. हे मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. खोतकर असो की कोणीही असो. ईडीच्या कारवाईला घाबरून भिऊन, दडपणाखाली कुणीही असं पुण्याचं काम करू नका. मी सांगतो, असंही त्यांनी सांगितलं.

  • 31 Jul 2022 01:12 PM (IST)

    Money Laundering Case : रुपाली चाकणकर म्हणतात…

    ईडी कारवाई कोणावर होते अन कोणावर होत नाही

    हे सगळं महाराष्ट्र पाहतोय

    राजकारणात अनेक वेळा आरोप केले जाता

    गाडीभर पुरावे अन गाडी कोणीच पोहचले नाही

    पण ईडी कारवाई त काही निष्पन्न होत नाही

    मलिक आणि देशमुख यांच्यातून काय समोर आलं

    यामुळे कुटुंबियावर परिणाम होतो

  • 31 Jul 2022 01:02 PM (IST)

    Sanjay Raut ED Summoned Live : नाना पटोले यांचा भाजपला सवाल

    आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू

    असं इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अमंलबजावणी भाजप सरकार करतंय

    संजय राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही

    ही दबाव आणि त्यांना ब्लॅक मेल करण्यासाठी कारवाई

    अजून किती लोकांना त्यांना जेलमध्ये टाकायचं हे त्यांनी ठरवावं

    परंतु भारतातील लोकशाहीला ते सोप्या पद्धतीनं हलवू शकणार नाहीत

    येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल यात दुमत नाही

  • 31 Jul 2022 12:49 PM (IST)

    MP Sanjay Raut ED Summoned updates : रामदास कदमांचा संजय राऊतांना टोला

    सकाळपासून संध्याकाळपर्यंत राऊत सर्वच प्रश्नांची उत्तरे देतात

    त्यांच्यासाठी ईडीबिडी काय?

    रामदास कदमांचा टोला

  • 31 Jul 2022 12:37 PM (IST)

    MP Sanjay Raut ED Summoned Live : शंभूराज देसाई यांचा राऊतांना सल्ला

    कर नाही तर डर कशाला

    खासदार संजय राऊत यांनी ED ला सहकार्य करावं

    त्याचा कांगावा करू नये

    माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा राऊतांना सल्ला

  • 31 Jul 2022 12:24 PM (IST)

    हुपरी शहरात शिवसैनिकांची निदर्शन

    संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाई विरोधात शिवसैनिक आक्रमक

    हुपरी शहरात शिवसैनिकांची निदर्शन

    ईडी विरोधात केली जोरदार घोषणाबाजी

    केंद्र सरकार दबावतंत्र वापरत असल्याचा केला आरोप

    जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आंदोलन

  • 31 Jul 2022 12:10 PM (IST)

    MP Sanjay Raut ED Summoned Live : शिवसैनिक आक्रमक

    आधी आम्हाला अटक करा

    मग संजय राऊतांना अटक करा

    शिवसैनिक आक्रमक

  • 31 Jul 2022 11:48 AM (IST)

    MP Sanjay Raut ED Summoned Live : अजित पवार म्हणतात…

    दोषींवर कारवाई व्हावी

    तो कुठल्याही पक्षाचा

    कुठल्याही गटाचा

    किंवा जातीधर्माचा असेल तरी

  • 31 Jul 2022 11:41 AM (IST)

    MP Sanjay Raut ED Summoned updates : नितेश राणे बरसले…

    राऊत म्हणत आहेत की मी शिवसेना सोडलेली नाही

    पण त्यांना बोलावलंय कुणी?

    राऊत तुमच्यासारखी घाण कुठल्याच पक्षाला नको आहे

    कुणीच आमंत्रण देत नाही

  • 31 Jul 2022 11:29 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल

    आढावा बैठकीला होणार सुरुवात

    इकडे विकास कामांची मोठी कारवाई करायची आहे

    ईडी कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

  • 31 Jul 2022 11:20 AM (IST)

    अरविंद सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

    राऊत अधिवेशनानंतर चौकशीसाठी जाणार होते

    पण राज्यपालांच्या विधानाचा विसर पडावा म्हणून राऊतांवर आज कारवाई

    पण महाराष्ट्र राज्यपालांचं विधान विरणार नाही

  • 31 Jul 2022 11:14 AM (IST)

    किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

    जे जे होते, ते ते पाहात राहावे आणि सामोरे जावे

    संजय राऊत घाबरणारे नाहीत

    चौकशीला सामोरे जातील

    ते निर्दोष आहेत

  • 31 Jul 2022 11:06 AM (IST)

    निलेश राणेंचं राऊतांवर टिकास्त्र

    संजय राऊतांची ईडी चौकशी

    निलेश राणेंकडून टिकास्त्र

    गुड मॉर्निंग, संज्याचे बारा वाजले.

    — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 31, 2022

  • 31 Jul 2022 11:04 AM (IST)

    संजय राऊतांना अटक होण्याची शक्यता

    राऊतांच्या मैत्री बंगल्यावर ईडीचं पथक

    राऊतांनी अटक होण्याची शक्यता

  • 31 Jul 2022 10:52 AM (IST)

    काही चूक केली नसेल तर राऊतांनी घाबरण्याचं काही कारण नाही-भागवत कराड

    संजय राऊत यांची चौकशी ईडी मार्फत सुरू आहे ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे

    संजय राऊत यांनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही

    संजय राऊत यांची चौकशी आणि ईडी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही

    जे कोणी शिवसेनेचे नेते भाजपवर आरोप करत असतील ते चुकीचे आहे त्यांच्या आरोपांचे मी खंडन करतो

  • 31 Jul 2022 10:38 AM (IST)

    संजय राऊतांचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत- नवनीत राणा

    ईडीच्या कारवाईचे पत्ते उघडायला सुरुवात झाली आहे

    संजय राऊतांचे कनेक्शन हे मातोश्रीपर्यंत आहे

    संजय राऊत यांचा पापाचा घडा भरला आहे

    20 ते 25 बिल्डर सोबत संजय राऊत यांची भागीदारी आहे

    त्याचे पुरावे माझ्याकडे आहे

    हनुमान चालीसा वरून त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं

  • 31 Jul 2022 10:27 AM (IST)

    रामदास कदम राऊतांवर बरसले

    रामदास कदम म्हणातात…

    संजय राऊत बाळासाहेब नव्हे तर शरद पवारांच्या विचारांचे पाईक

    संजय राऊतांनी पवारांच्या नादी लागून शिवसेना संपवली

    उद्धव ठाकरेदेखील पवारांच्या सांगण्यावर चालतात

  • 31 Jul 2022 10:27 AM (IST)

    नवनीत राणा यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

    नवनीत राणा म्हणतात…

    पापाचा घडा भरला की तो फुटतोच

    संजय राऊत यांना अटक होणार

    संजय राऊत हे 25 कंपनीत भागीदार आहे

    ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती

  • 31 Jul 2022 10:17 AM (IST)

    किरीट सोमय्या राऊतांवर बरसले

    शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी

    राज्यातील जनतेची इच्छा

    संजय राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार

    राऊत कुटुंबासह परदेशात फिरायला जात होते

    परदेशवाऱ्यांसाठी पैसा आला कुठून?

     हॉटेलचं बिल कोण देत होतं?

  • 31 Jul 2022 10:07 AM (IST)

    नितेश राणेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र

    आव आणणाऱ्यांची ईडी चौकशीत कशी त्रेधातिरपीट उडणार

    नितेश राणेंचं टीकास्त्र

    सगळ्यांची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब

    मनोमन समाधान वाटतं

    राऊतांच्या घरात कॅमेरा लावायला हवा

    ईडी चौकशीदरम्यान त्यांची काय अवस्था ते कळेल

  • 31 Jul 2022 09:59 AM (IST)

    संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

    संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

    राऊत यांच्या अडचणीत वाढ

    पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी

    10 ईडीचे अधिकारी राऊतांच्या मैत्री बंगल्यावर दाखल

Published On - Jul 31,2022 9:49 AM

Follow us
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.