जम्मू : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे दोन दिवसांच्या जम्मू दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. संजय राऊत हे पहिल्यांदाच जम्मू दौऱ्यावर गेलेत. त्यांचा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी विमानतळावर शिवसैनिक (Shiv Sainik) जमले होते. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये उद्या, शुक्रवारी सहभागी होणार आहेत.
त्यापूर्वी संजय राऊत यांचे अनेक कार्यक्रम आहेत. जम्मूत ते काश्मिरी विस्थापित पंडितांना भेटणार आहेत. विमानतळावर संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंजाब आणि जम्मू काश्मीरचे शिवसैनिक संजय राऊत यांच्या स्वागतासाठी आले होते.
या दौऱ्यातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुठपर्यंत पसरले आहेत हे दिसत असल्याचं संजय राऊत म्हणाले.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष अजूनही महाराष्ट्राच्या बाहेर काम करतो. फक्त आमचा संवाद तुटलेला आहे, अशी कबुली संजय राऊत यांना यावेळी बोलताना दिली.
शिंदे गटाचे काही मंत्री असं म्हणतात की, संजय राऊत हे जम्मूत आले आहेत. आता संजय राऊत यांनी पुढं पाकिस्तानात जावं. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हो आम्हाला पाकिस्तान घ्यायचाच आहे. त्यांना जमलं नाही, ते आम्ही नक्की करू.
कार्यक्रम कशाचा आहे, असं विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, पाकिस्तान ताब्यात घेण्याविषयी ते बोलत असतील, तर तोच कार्यक्रम असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांच्या पाकिस्तान दौऱ्यात ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळं त्यांच्या या दौऱ्याकडं राजकीयदृष्ट्या कुतुहलानं पाहिलं जातंय.