मोदी, शहा आणि फडणवीस यांची भेट घेणार; संजय राऊत यांनी भेटीचं कारणही सांगितलं
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा नसतो. मी फडणवीसांना भेटणार. मोदी आणि शहांनाही भेटणार. माझ्याबाबत काय झालं त्याची माहिती मी मोदी आणि शहा यांना देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर आज पहिल्यांदाच मीडियाशी सविस्तर संवाद साधला. तुरुंगातील यातना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुरुंगात राहणं फारच कठिण असतं, असं सांगतानाच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी सांगितलं. माझ्यावर काय अन्याय झाला याची तक्रारच मोदी आणि शहांकडे करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत तब्बल तीन महिन्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करतानाच त्यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं. मी सर्वांना भेटणार आहे. मी फडणवीस यांनाही दोन-तीन दिवसात भेटणार आहे. लोकांची काही कामे आहेत. माझा भाऊ आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघातीलही कामे आहेत. त्यामुळे मी फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. हे माझं निरीक्षण आहे. राज्याचं नेतृत्व फडणवीसच करत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडूनच ऐकत आहेत. त्यांच्या खात्याशी निगडीत काम आहे. त्यामुळे मी त्यांना भेटणार आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा नसतो. मी फडणवीसांना भेटणार. मोदी आणि शहांनाही भेटणार. माझ्याबाबत काय झालं त्याची माहिती मी मोदी आणि शहा यांना देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी खासदार आहे. मी सरकारी कामासाठी कुणाला भेटू शकतो. माझा भाऊ आमदार आहे. कोणत्या कामासाठी भेटू शकत नाही का? हा महाराष्ट्र आहे. इथे राजकारणी एकमेकांना भेटत असतात. मी तुरुंगात होतो. तेव्हा फडणवीस म्हणाले होते कटुता थांबली पाहिजे. त्यामुळे फडणवीस यांना भेटलं तर गैर काय? असं सांगतानाच भाजपच्या विरोधात लढाई सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.