जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन, ‘पवारांना खुर्ची देताना माणुसकीचं दर्शन’, भाजपवर शरसंधान
संजय राऊत यांनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी राऊतांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. त्याचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरुन भाजप नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर खोचक टीका करण्यात येतेय. अशावेळी शिवसेना आणि खुद्द संजय राऊत यांच्याकडूनही भाजपला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राऊतांच्या कृतीबाबत त्यांना नमन केलंय. तसंच राऊतांकडून माणुसकीचं दर्शन झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांकडून राऊतांच्या कृतीचं कौतुक
‘संजय राऊत यांनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही. वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते करतोच. संजय राऊत यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? हे महाराष्ट्रात काय सुरु आहे?’, असा सवाल आव्हाड यांनी केलाय.
‘मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल ज्यांना माहिती आहे त्यातील संजय राऊत आहेत. त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि नमन करतो’, असंही जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाले.
नमन @rautsanjay61 #sanskar #Sanskari #Sanskruti pic.twitter.com/ZGZUaUKY4C
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 9, 2021
संजय राऊतांची जीभ घसरली
शरद पवार यांना खुर्ची देतानाच संजय राऊतांचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून राऊतांना ट्रोल केलं जात आहे. भाजपच्या काही नेत्यांनीही या फोटोवरून राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.
अतुल भातखळकरांचा टोला
‘धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच’, असं ट्विट करत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावलाय.
धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते @PawarSpeaks गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच. pic.twitter.com/dnePHj6B5e
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 8, 2021
इतर बातम्या :