सुनील तटकरे यांना छाती आहे काय?, तटकरेंना खोटं बोलण्याचा नाद; संजय राऊत यांचा हल्लाबोल
सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. आता सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देताना संजय राऊत हे दिसले. हेच नाही तर त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल चढला. तटकरे यांना खोटे बोलण्याचा नादच असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले.
मुंबई : सुनील तटकरे यांनी टीव्ही9 च्या काॅनक्लेव्हमध्ये बोलताना संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला होता. हेच नाही तर संजय राऊत यांच्यावर काही आरोप करताना देखील सुनील तटकरे हे दिसले. आता संजय राऊत यांनी सुनील तटकरे यांचा चागंलाच समाचार घेतल्याचे बघायला मिळतंय. संजय राऊत यांनी थेट सुनील तटकरे यांना खोटारडे म्हणून टाकले. फक्त सुनील तटकरेच नाही तर यावेळी संजय राऊत यांनी अनेक नेत्यांचा समाचार देखील घेतला. भाजपावर जोरदार टीका करताना राऊत हे दिसले.
संजय राऊत म्हणाले की, तटकरे खोटे बोलत आहेत. तटकरे काही ब्रह्मदेव आहेत का? तटकरेंकडे छाती आहे का. हिंमतबाज माणसाकडे छाती असते, त्यांच्याकडे कुठे आहे, असेही संजय राऊत यांनी म्हणत तटकरेंवर हल्लाबोल चढवला. यावेळी संजय राऊत यांच्याकडून मोठा खुलासा देखील करण्यात आला.
पुढे राऊत म्हणाले, भाजपसोबत जायची चर्चा झाली. पण जायचं नाही हे ठरलं. उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत जाण्याची चर्चा होती, ते खोटं बोलतात. त्यांना खोटं बोलण्याचा नाद आहे. ते अंतुलेशी खोटं बोलले. शरद पवारांशी खोटं बोलले. ते मायबापावर विश्वास ठेवत नाही, असे म्हणत संजय राऊत हे तटकरे यांच्यावर सडकून टीका करताना दिसले.
सुनील तटकरे यांना खोटे बोलण्याचा नाद असल्याचे विधान थेट संजय राऊत यांनी केले. आता संजय राऊत यांच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सुनील तटकरे यांनी म्हटले होते की, संजय राऊत यांना त्यांची माणसं थांबवता आली नाहीत, आम्हाला कसे थांबवतील. शिवसेनेतील एका तरी व्यक्तीला राऊतांनी थांबवलं का.
हेच नाही तर सुनील तटकरे यांनी असेही म्हटले होते की, संजय राऊत हे काही आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. संजय राऊत कोण आम्ही कुठे जावं हे ठरवणारे, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले होते. याचाच समाचार हा आता संजय राऊत यांच्याकडून घेण्यात आलाय. लोकसभा निवडणूकीबद्दल बोलताना देखील संजय राऊत हे दिसले.