‘INS विक्रांत’ हा सर्वात मोठा घोटाळा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊत आक्रमक

INS विक्रांतने अनेक सैनिकांचं बलिदान पाहिलं आहे. पाकिस्तानची फाळणी विक्रांतने पाहिली. पुरावे असताना विरोधी पक्षनेते नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते बाजू घेतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवलाय.

'INS विक्रांत' हा सर्वात मोठा घोटाळा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊत आक्रमक
संजय राऊत, खासदार, शिवसेनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 8:41 PM

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग आणि दिल्लीतील संपत्ती जप्त करण्यात आलीय. या कारवाईनंतर आता संजय राऊत अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी कारवाई सुरु आहे. INS विक्रांतचा सर्वात मोठा घोटाळा वाटतो. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. फडणवीसही या घोटाळ्याचं समर्थन करत होते. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. INS विक्रांतने अनेक सैनिकांचं बलिदान पाहिलं आहे. पाकिस्तानची फाळणी विक्रांतने पाहिली. पुरावे असताना विरोधी पक्षनेते नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते बाजू घेतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवलाय.

INS विक्रांत प्रकरणी संजय राऊतांचा आरोप काय?

राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांचा आणखी एक घोटाळा आज बाहेर काढला. 2013-14 आणि 2014-15 साली देशाच्या संरक्षण दलाचा अभिमान असलेली आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी भाजपाचा झेंडा घेऊन सेव्ह विक्रांत नावाने मोहिम सुरु केली. लाखो-करोडो मुंबईकरांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र या रकमेचे पुढे काय झाले? आयएनएस विक्रांत तर भंगारात गेली. त्यावेळी 57 कोटी रुपये अशी ही रक्कम सांगण्यात आली होती. प्रत्यक्षात 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या घशात घातली, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. या गुन्ह्याची चौकशी का केली जाऊ नये, असा सवालही राऊत यांनी केलाय.

ती रक्कम राज्य सरकारकडे आलीच नाही!

किरीट सोमय्या यांनी सुरु केलेल्या मोहिमेला लाखो मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. यातून 57 कोटी रुपये तेव्हा जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ही रक्कम राजभवनात जमा करू, असं किरीट सोमय्या म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम राज्य सरकारकडे देण्यात आलेली नाही. वीरेंद्र उपाध्याय या माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेल्या माहितीवरून नुकतचं हे प्रकरण उघडकीस आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच या कार्यकर्त्याला राज्यपालांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटलंय की अशा प्रकारची रक्कम राज्य शासनाकडे आलेली नाही, मग ही रक्कम किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या घशात घातली आहे. निवडणुकीवर आणि स्वतःच्या मुलाच्या कंपनीवर त्यांनी ही रक्कम खर्च केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. लाखो-करोडो मुंबईकरांच्या भावनेशी हा खेळ असून हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

इतर बातम्या :

Video : संजय राऊतांना राज्यसभेत बोलण्यापासून रोखलं! राऊतांनी केंद्रावर गंभीर आरोप केल्यानंतर नेमकं काय घडलं?

‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची’, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना थेट आव्हान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.