‘माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त प्रसिद्ध झालेल्या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी आपल्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. पत्नी वर्षा राऊत यांच्या झालेल्या ईडी चौकशीत चंद्रकांत पाटील यांनी आपला चुकीचा संदर्भ जोडल्याचं राऊतांनी म्हटलंय.

'माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार', संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 2:52 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक लढाई संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र, आता एका प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवलीय. माझ्या बदनामीबाबत माफी मागा. अन्यथा मानहानीचे प्रकरण न्यायालयात दाखल करणार, असा इशारा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिलाय. (Sanjay Raut issues notice to Chandrakant Patil in defamation case)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी आपल्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. पत्नी वर्षा राऊत यांच्या झालेल्या ईडी चौकशीत चंद्रकांत पाटील यांनी आपला चुकीचा संदर्भ जोडल्याचं राऊतांनी म्हटलंय. दरम्यान, संजय राऊत यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं.

सव्वा रुपयाचा दावा!

चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. चंद्रकांतदादा हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा चिमटाही राऊत यांनी काढला होता.

चंद्रकांतदादांनी पाठवलेल्या पत्रात काही दळभद्री आरोप केले आहेत आमच्यासंदर्भात. पीएमसी बँक आणि अमूक बँक. त्याबाबत मी चंद्रकांत पाटलांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांच्यावर दावा करणार आहे. इतर लोकं लावतात 100 कोटी, 50 कोटी असा दावा करणार नाही. सव्वा रुपयांचा दावा लावू. त्यांची तेवढीच ताकद आहे. सव्वा रुपयेच फक्त. त्यांच्याकडे तेवढेच आहेत. सव्वा रुपयावाले आहेत. 100 कोटींचा दावा कशाला? मला नको शंभर कोटी. ज्यांना हवा ते दावा लावतात. सव्वा रुपया ठिक आहे. ज्यांची जेवढी लायकी तेवढा दावा लावायचा असतो, असा चिमटाही त्यांनी काढला होता.

‘संजय राऊत मित्र, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी’

संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या नोटीसीला चंद्रकांत पाटील आता काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन, छापेमारीचा तीव्र निषेध

ड्रग्स प्रकरणात मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप, आता मुनगंटीवारांचं मलिकांना जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Raut issues notice to Chandrakant Patil in defamation case

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.