“देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी प्रगल्भ पण ‘महामोर्चा’ला नॅनो म्हणणं चुकीचं”, संजय राऊतांचा पलटवार

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदेगटावर शाब्दिक हल्ला चढवलाय...

देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी प्रगल्भ पण 'महामोर्चा'ला नॅनो म्हणणं चुकीचं, संजय राऊतांचा पलटवार
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 2:45 PM

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांची बुद्धी प्रगल्भ आहे. पण महाविकास आघाडीच्या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हणणं चुकीचं आहे. नॅनो बुद्धीविषयीच बोलायचं असेल तर शिंदेगटाचे 40 आमदार नॅनो बुद्धीचे आहेत, असं म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेगटावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

फडणवीस यांची महामोर्चावर प्रतिक्रिया

वारंवार महापुरूषांच्या होणाऱ्या अवमानाविरोधात महाविकास आघाडी काल रस्त्यावर उतरली होती. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांनी एकत्र येत ‘महामोर्चा’ काढला. त्यावर देवंद्र फडणवीस यांनी टीका केली. “महाविकास आघाडीचा महामोर्चा अयशस्वी ठरलाय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे महाविकास आघाडीचा हा मोर्चाही नॅनो होता”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलंय.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदार आणि त्यांच्या नेत्यांनी केलं असतं तर त्यांची बुद्धी नॅनो आहे, असं म्हणता आलं असतं. फडणवीस प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांनी असं विधान करणं महाराष्ट्राला अपेक्षित नाही. त्यांनी विरोधीपक्षात प्रदीर्घ काळ काम केलं. त्यांना कालचा विराट मोर्चा दिसला नसेल, त्यांनी अनुभवला नसेल तर हे त्यांचं दुर्देव आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानावर प्रतिक्रिया दिलीय.

फडणवीस कालच्या मोर्चाला नॅनो म्हणत असतील तर मला त्यावर विश्वास ठेवायला जरा जड जातंय. पण काही दिवसांआधी फडणवीस दिल्लीत गेले होते. तिकडे दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं इजेक्शन दिलेलं दिसतंय. ती गुंगी त्यांची उतरलेली नसल्याचं दिसतं. त्याचमुळे फडणवीस कदाचित असं बोलत असावेत, असंही राऊत म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.