Sanjay Raut : ‘शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची…’ जागा वाटपावरुन संजय राऊत यांचं मोठं विधान

Sanjay Raut : नाना पटोले जागा वाटपात अडवणुकीची भूमिका घेतायत अशी चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, "मी असं म्हटलेलं नाही. माझ्या तोंडी तुम्ही हे वाक्य घालू नका. मी कोणावरही व्यक्तीगत मतप्रदर्शन केलेलं नाही.

Sanjay Raut : 'शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची...' जागा वाटपावरुन संजय राऊत यांचं मोठं विधान
sanjay raut
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 10:53 AM

“काँग्रेस आणि आमच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा थांबलेली असं म्हणता येणार नाही. काल दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चा सुरु होती. जयंत पाटील आणि आम्ही चर्चेला बसलो होतो. राष्ट्रवादी आणि आमच्यातील बरेचसे पेच सुटलेले आहेत. शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते, ती आमच्या दोघांमध्ये आहे” असं खासदार संजय राऊत नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले. “अनेक जागांवरचा तिढा आम्ही सोडवलेला आहे. अर्थात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन असतं. राष्ट्रवादी आणि आमच्या बऱ्याच गोष्टी मोकळ्या झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज 11.30 वाजता मातोश्रीवर येतील. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतील” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

नाना पटोले जागा वाटपात अडवणुकीची भूमिका घेतायत अशी चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मी असं म्हटलेलं नाही. माझ्या तोंडी तुम्ही हे वाक्य घालू नका. मी कोणावरही व्यक्तीगत मतप्रदर्शन केलेलं नाही. तेवढी सभ्यता, संस्कृतपणा आमच्यात आहे” “आघाड्या निर्माण होतात, तेव्हा जागावाटपात असे अडथळे येतात. शिवसेना-भाजपा एकत्र होते, तेव्हा असे अडथळे यायचे” असं संजय राऊत म्हणाले.

आज 12.30 वाजता काय समजणार?

“काँग्रेस मोठा राजकीय पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षाने स्थान दिलं पाहिजे. केरळ, कर्नाटक तसच अन्य राज्यात प्रादेशिक पक्षांच्या जोरावर राजकारण सुरु आहे. प्रादेशिक पक्ष नसते, तर मोदी आज पंतप्रधान होऊ शकले नसते. इंडिया आघाडीत सर्वात जास्त प्रादेशिक पक्ष आहेत” असं संजय राऊत म्हणाले. सोमवार-मंगळवार पर्यंत जागावाटप जाहीर होईल का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “राष्ट्रवादी आणि आमच्यात जागा वाटप संपलेलं आहे. आमच्यात फार मतभेद नाहीत. आमच हायकमांड मुंबईत आहे. काँग्रेस-शिवसेनेत काय फायनल होतं, ते आज 12.30 वाजेपर्यंत समजेल”

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.