Sanjay Raut : बंडखोरातही बंडखोरी होऊ शकते, काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊतांचं सूचक विधान

बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते. बंडोखोर आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : बंडखोरातही बंडखोरी होऊ शकते, काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊतांचं सूचक विधान
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 11:13 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी शिवसेनेतून (shivsena) बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) अस्थिर बनले आहे. शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. शिवसेनेच्या तब्बल 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याचे चित्र आहे. आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. बंडखोरातही बंडखोरी होऊ शकते, काही आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आम्हालाही रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये कार्यक्रमासाठी 40 खोल्या लागत होत्या. त्याबाबत आम्ही हॉटेल व्यवस्थापनाला मेल केला आहे. मात्र अद्यापही मेलला उत्तर आले नाही, असे म्हणत आसामच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अडीच वर्ष मलाईदार खाती होती तेव्हा अन्याय आठवला नाही का?, असा सावलही यावेळी राऊतांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. यावर बोलताना राऊत यांनी म्हटले की जरा संयम ठेवा, बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते. बंडखोर आमदारांपैक काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. माझं बंडखोर आमदारांना आव्हान आहे की त्यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत आणि पुन्हा निवडणूक लढावी. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अडीच वर्ष मलाईदार खाती होती, तेव्हा अन्याय आठवला नाही का असा सवाल राऊतांनी केला आहे. बाळासाहेबांचे भक्त आहोत असे सांगून पाठीत खंजीर खुपसला, अशी घणाघाती टीका यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘रोखठोक’मधून निशाणा

संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील रोखठोक या सदरातून देखील बंडखोरांवर निशाणा साधला आहे. फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या ठरतील, राणे, भुजबळ मुख्यमंत्री झाले नाहीत मग शिंदे मुख्यमंत्री होणार काय असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. या बंडखोर आमदारांना भाजपाचीच साथ आहे. भाजप जर मदत करत नसते तर हे आमदार पहिल्यांदा सुरतला गेलेच नसते. सुरतवरून त्यांना स्पेशल विमानाने आसाममध्ये नेण्यात आले. आसाममध्ये देखील भाजपाचेच सरकार आहे. आसाममध्ये भाजपाने या आमदारांची व्यवस्था केली, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.