Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Pc : जितेंद्र नवलानीच्या माध्यमातून ईडीचं वसुलीचं रॅकेट, संजय राऊतांनी यावेळेस पुराव्यानिशी मांडलं, वाचा सविस्तर

सकाळपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू असताना राऊतांनी ही पत्रकार परिषद घेतलीय. यात संजय राऊतांनी अनेकांची नावं घेतली आहे. हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना यात जितेंद्र नवलाणी हे नाव सर्वात महत्वाचे आहे, असा उल्लेख केला आहे.

Sanjay Raut Pc : जितेंद्र नवलानीच्या माध्यमातून ईडीचं वसुलीचं रॅकेट, संजय राऊतांनी यावेळेस पुराव्यानिशी मांडलं, वाचा सविस्तर
संजय राऊतांचे मोठे आरोपImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 5:00 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut Press Fonference) आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सकाळपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र  सुरू असताना राऊतांनी ही पत्रकार परिषद घेतलीय. यात संजय राऊतांनी अनेकांची नावं (Bjp) घेतली आहे. हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना यात जितेंद्र नवलानी हे नाव सर्वात महत्वाचे आहे, असा उल्लेख केला आहे. जितेंद्र चंद्रलाल नवलानी (Jitendra navlani) असे या व्यक्तीचे संपूर्ण नाव राऊतांनी सांगितलं आहे. यात 60 कंपन्यांनी 100 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसुल केलेत. या कॅश आणि चेक पेमेंटही आहे. डिजीटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्याची ईडीनं चौकशी केली. त्या कंपन्यांनी ईडीचा पैसा ट्रान्सफर केला. हा नवलानी ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी काम करतो, असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.

नवलानी आणि सोमय्यांचा काय संबंध?

2017 मध्ये ईडीनं दिवाणा हाऊंसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. जितेंद्र नवलानीला 25 कोटी ट्रान्सफर झाले..मग 31 मार्च 2022 पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग भोसलेंकडून 10 कोटी ट्रान्सफर केले नवलानीला, नवलानीच्या सात कंपन्यांनी कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले.15 कोटी रुपये अशाच एका चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. अनसिक्युअर्ट ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही, तर असा ईडीचा पैसा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश चैक अशा वेगवेगळ्या स्वरुपात ट्रान्सफर झालाय. ईडीच्या कोणत्या अधिकारीच्या अकाऊंटमध्ये कुठे कसे पैसे गेलेत हे हळूहळू सांगेन. नवलानी कोणंय..? सौमय्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, असा सावल राऊतांनी उपस्थित केलाय.

देशात मोठं रॅकेट सुरू

तर ईडीचे मोठे अधिकारी या नवलानीसोबत कसे जोडले गेले आहेत. पब्लिक सेक्टर बँकेचं लोन न देणारे लोक नवलानीला कसले पैसे देतात, तर कसली कन्सलटन्सी देतात, हा सगळा पैसे दिल्ली आणि मुंबईत बसलेल्या ईडी ऑफिसरला दिला जातोय, परदेशात या पैशांनी बाहेर जमीन खरेदी केली जाते आहे. आणि आता आमच्या लोकांचे एक दोन तीन लाखाचे व्यवहार पाहत आहेत. तुमचं ट्रान्सझॅक्शन कोण पाहणार आहे. हे मी हवेत बोलत नाहीय.. कागद दिलंय, असेही राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे. देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं हे सगळ्यात मोठं रॅकेट आहे. मविआच्या लोकांना चुचकारण्याचं काम जे होतंय. हेही याच रॅकेटचा भाग आहे. ही फक्त 10 टक्के गोष्ट आहे. याबाबत एक अहवालही समोर आला आहे. विजिलन्स रिपोर्ट समोर आला आहे. तोही मी पीएमला पाठवलाय, असेही यावेळी राऊतांनी सांगितलं.

राऊतांनी पुरावे मांडले

तसेच मी 15 फेब्रुवारीला ईडी अधिकाऱ्याबद्दल बोललो होतो. अनेक नेते आहेत भाजपचे यात, सोमय्या तर गेस्ट आर्टिस्ट आहेत. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचं तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. जो ईडीचा अधिकारी होती ज्यानं निवडणूक लढवली, त्यानं पन्नास जणांचं खर्चही केलाय. ईडी भाजपची एटीएम मशिन बनलीये. मी अतिशय जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय. एक्स्टॉर्शनच्या बाबतीतली सगळा कच्चाचिट्ठा पीएम कार्यालयाला दिलाय. तुम्ही स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नाहीये, तर भ्रष्टाचारही साफ करायचाय. मी पत्र लिहिलंय की म्हटलंय की ईडीला जे तुम्ही कामाला लावलंय. जे तुमचे राजकीय विरोधक आहेत. भाजपविरोधात दहा भाग पीएम कार्यालयाला देणारा. भाग भागात देणार. मागच्या काही वर्षांपासून ईडीचे काही अधिकारी आणि एजंट त्यांचं एक नेटवर्क बिल्डर डेव्हलपर आणि कॉर्पोरेटला धमकावण्याचं काम करतंय. ईडीकडून या सगळ्यांकडून वसुली केली जातेय. या सगळ्यांचे डॉक्युमेन्ट्साही दिलेत, असे पुरावे आज संजय राऊतांनी माडंले आहेत.

सुमीत कुमार नरवरकडे भाजपच्या महाराष्ट्र, दिल्लीतील बड्या नेत्याचा पैसा, लवकरच पर्दाफाश करणार; राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut PC : ईडी, आयटीच्या धाडी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Press Conference LIVE : आज राऊतांचं टार्गेट काय? शिवसेना भवनावरून दुसरी पत्रकार परिषद

कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्..
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्...
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट.
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्...
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्....
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.