सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, उद्या मला काही झालं तर… संजय राऊत यांचा राज्य सरकारला इशारा

मी जिथे बसतो तिथली सुरक्षा काढली. तुरुंगातूनबाहेर जाताना आणि येताना मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती. काही तरी होईल हे माहीत होतं. म्हणून सुरक्षा दिली होती.

सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, उद्या मला काही झालं तर... संजय राऊत यांचा राज्य सरकारला इशारा
सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, उद्या मला काही झालं तर...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 12:50 PM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यावरून संजय राऊत याांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. हे सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. उद्या मला काही झालं तर त्याला हे सरकारच जबाबदार असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

माझ्या घराची रेकी होते हे पोलिसांकडून कळलं आहे. मुंबईतील झालेल्या दंगलीपासून मला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. 25 ते 30 वर्ष मला सुरक्षा पुरवण्यात आली होती. पण ही सुरक्षा या सरकारने काढून घेतली. आम्ही मागितली नाही. मागणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मी सामनात बसतो. मी जिथे बसतो तिथली सुरक्षा काढली. तुरुंगातूनबाहेर जाताना आणि येताना मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती. काही तरी होईल हे माहीत होतं. म्हणून सुरक्षा दिली होती. तरीही माझी सुरक्षा काढली. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळतंय.

पण काही झालं तरी मी सरकारडे सुरक्षा मागणार नाही. कोणत्या नियमाने आणि कोणत्या भूमिकेतून सुरक्षा कोढली? माझी सुरक्षा काढण्याची शिफारस करण्याची शिफारस करणारी ही कोणती कमिटी आहे? कशासाठी सुरक्षा काढली?, असा सवाल त्यांनी केला.

एका क्षणात माझी सुरक्षा काढली. कोणत्या कारणाने काढली मला माहीत नाही. माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार राहील. हे सुडबुद्धीने झालं आहे. आम्ही काम करू नये असं त्यांना वाटतं. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही आमचं काम करत राहू, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या इशाऱ्याचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तिच्या सुरक्षेबाबत आढावा समिती निर्णय घेत असते. त्यात राज्य सरकारचा संबंध नसतो. त्यामुळे संजय राऊत यांनी ओरड करू नये. जेव्हा आमची सुरक्षा काढली तेव्हा हेच संजय राऊत आम्हाला ज्ञान देत होते. आता त्यांनी इतरांना सामान्य ज्ञान द्यावे असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लागावला आहे.

राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.