Sanjay Raut : ‘त्या’ चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली; राऊतांचा पलटवार

Sanjay Raut : शिंदे गटाने आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस बजावली आहे. ठाकरे कुटुंबाला त्रास नको म्हणून त्यांनी इतर आमदारांना नोटीस बजावल्याचं राऊत यांच्या निदर्शनास आणून दिलं.

Sanjay Raut : 'त्या' चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली; राऊतांचा पलटवार
'त्या' चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली; राऊतांचा पलटवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 10:51 AM

मुंबई: चार लोकांच्या कोंडाळ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बावरट केलं, असा दावा शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्याला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील. दोघांनी राज्यातील हितासाठी काम करायला हवं. त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते चार लोकं पक्षाचं काम करत होते. आजही करत आहेत. गेली अडीच वर्ष का होईना तुम्ही सत्तेत राहिलात. तेव्हाही राहिलात. तेव्हाही हे चार लोकंच होती. आता त्यांना तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात. पण उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीयेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाना हवा असतो. ते काहीही बहाना शोधतात. ठिक आहे. तुम्ही निघून गेला. बहाणे देऊ नका. मंत्री आहात तर काम करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोरांना फटकारले आहे.

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे गटाने आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस बजावली आहे. ठाकरे कुटुंबाला त्रास नको म्हणून त्यांनी इतर आमदारांना नोटीस बजावल्याचं राऊत यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर राऊत यांनी शिंदे यांना फटकारलं. आदित्य ठाकरेंना सोडून इतरांना का नोटीस दिली माहीत नाही. जे 14 आमदार आहेत ते बाळासाहेबांचे चेले आणि सैनिक आहेत. हेही लक्षात ठेवा, असा टोला राऊत यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

राणे, भुजबळही तसेच बोलायचे

शिंदे यांचं भाषण चांगलं झालं असेल. मी दिल्लीला होतो. प्रवासात होतो. मी आता भाषण वाचलं. मुख्यमंत्री विश्वास ठराव जिंकतात तेव्हा त्यांना भूमिका मांडावी लागते. त्यांनी राज्याच्या हितासाठी काय करणार हे सांगण्याऐवजी पक्ष का सोडला याचा खुलासा करत होते. राणेंचं भाषणही असंच होतं. तुम्ही राणेंचं भाषण ऐकलं असेल तर त्यावेळी विधानसभेत राणे असंच बोलले होते. भुजबळांचं भाषणही याच पद्धतीचं होतं. पक्ष सोडणारा नेता दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा असे खुलासे करावे लागतात. माझ्यावरच कसा अन्याय झाला. मीच कसा बरोबर आहे. हे सांगावं लागतं. जनतेच्या भावनेला हात घालावा लागतो. त्या पद्धतीने त्यांचं उत्तम भाषण झालं, असा चिमटाही त्यांनी काढला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.