“राणेंची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ खाते सांभाळण्याची, कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”

नुकताच मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. जुन्या मंत्र्यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवून नव्या दमाच्या नेत्यांच्या मंत्रिपदाची इनिंग खेळण्याची संधी दिली. | Modi Cabinet Expansion

राणेंची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ खाते सांभाळण्याची, कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव
भागवत कराड, पंकजा मुंडे आणि नारायण राणे
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 7:46 AM

मुंबई :  नुकताच मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. जुन्या मंत्र्यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवून नव्या दमाच्या नेत्यांच्या मंत्रिपदाची इनिंग खेळण्याची संधी दिली. यात प्रीतम मुंडे याचंही नाव आघाडीवर होतं. मात्र त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. याच पार्श्वभूमीवर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहे. आजच्या सामना अग्रलेखातून तर कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा गंभीर दावा करण्यात आलाय. (Sanjay Raut Saamana Editorial Comment on Rarayan Rane Bhagwat karad And Pankaja Munde)

कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव

भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

राणेंची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ खाते सांभाळण्याची

महाराष्ट्रातून अखेर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरेच झाले. तेसुद्धा मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा प्रवास मनोरंजक आहे. राणे यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असे वाटले होते, पण लघु व मध्यम उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही.

राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल.

सहकार खात्यावर काय म्हणाले राऊत?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आताच्या विस्ताराआधी केंद्र सरकारने एक ‘सहकार खाते’ निर्माण केले. ‘सहकार’ हा तसा राज्याच्या अखत्यारीतला विषय, पण आता ‘केंद्र’ त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत आहे. तसे होऊ नये आणि संघराज्यरचनेवर हा आघात ठरू नये. अर्थात सध्या हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे. त्यामुळे करणार काय? केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देऊन मागील पानावरून पुढे जाणे इतकेच आपल्या हाती आहे.

(Sanjay Raut Saamana Editorial Comment on Rarayan Rane Bhagwat karad And Pankaja Munde)

हे ही वाचा :

मोदींच्या मंत्रिमंडळातील बरेच सदस्य भाजप आणि संघाचे नसून लाटेबरोबर वाहून आलेले ओंडके, सामनातून टीकेचा ‘बाण’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.