“…तर मोदी देशाला फसवत आहेत”, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे", असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

...तर मोदी देशाला फसवत आहेत, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
संजय राऊत पंतप्रधान मोदी
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 10:59 AM

Sanjay Raut On Narendra Modi Cheating : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एक प्रकारे मार्शल लॉ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे”, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊतांनी ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती 

“मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात. त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आला आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्यात बदल होईल काय? (म्हणजे ते आता तरी सुधारतील काय?) असा प्रश्न अनेकांना अनेकदा पडत असेल. पंतप्रधानपदावर तीन वेळा बसलेल्या व्यक्तीने निदान देशाला भ्रमित करण्याची, खोटे बोलण्याची सवय तरी सोडून दिली पाहिजे, पण तिसऱ्यांदा शपथ घेऊनही मोदी बदलायला तयार नाहीत. त्यांचे फेकणे सुरूच आहे”, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

ते देशाला फसवत आहेत

“राज्यसभेतील त्यांचे बुधवारचे भाषण हा फेकाफेकीचा उत्तम नमुना आहे. मोदी यांना आता विकासावर बोलावेसे वाटले. मागच्या दहा वर्षांत विकास वगैरे काही झालेला नाही. देशातील 80 कोटी लोकांना महिन्याला माणशी पाचेक किलो धान्य फुकटात देणे याला मोदी विकास मानत असतील तर ते देशाला फसवत आहेत”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

“राज्यसभेतील एक सदस्य मनोज झा यांनी सांगितले, ‘‘ग्रामीण भागात आता मजूर मिळत नाहीत. लोकांना घरबसल्या फुकट धान्य मिळते. त्यामुळे लोक आळशी होत आहेत. मजूर मिळत नसल्याने कामे रखडली आहेत.’’ मोदी व त्यांच्या सरकारने गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली कोटय़वधी लोकांना घरबसे व आळशी केले. घरी बसा व फुकटात धान्य घ्या, त्या बदल्यात आम्हाला मते द्या, अशी मोदी यांची भूमिका दिसते. मोदी यांनी त्यांच्या भाषणात जे पतंग उडवले तेदेखील नेहमीचेच होते. तीच दारू, तीच बाटली, बाकी काय? मोदी यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचा जुनाच नारा दिला. भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना सोडणार नाही. ईडी, सीबीआयच्या नावाने उगाच बोंब मारू नका. या संस्था उत्तम काम करीत असल्याचे मोदी सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ाप्रमाणे वागत आहेत”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

मोदींच्या राज्यात ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती

“मोदी यांनी गायी कापणाऱ्या व गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून निधी स्वीकारला व लोकसभेत ते हिंदुत्वावर प्रवचने झोडतात. मोदी यांच्या हिंदुत्वाचा पराभव प्रत्यक्ष अयोध्येतच झाला. कारण सत्यवचनी रामाला भाजपचा खोटारडेपणा मान्य नव्हता. 1975 साली विरोधी नेत्यांनी सैनिकांना सरकारविरुद्ध बंड करण्याची चिथावणी दिली हे मोदींना मान्य आहे काय? मोदींना त्यांच्याविरुद्ध काढलेले व्यंगचित्र सहन होत नाही. व्यंगचित्रकारांवर ते देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतात. इथे तर देशाच्या सैन्यालाच देशविरोधी पृतीचे आवाहन केले गेले होते. पोलिसांनी सरकारी आदेश पाळू नयेत असे चरणसिंग वगैरे नेते तेव्हा सांगत होते व ते भयंकर होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी बॉम्ब बनविण्याचा कारखानाच उघडला होता व त्यांना इंदिरा गांधी यांनाच उडवायचे होते. हे सर्व घडवले जात असताना इंदिरा गांधी यांनी काय करायला हवे होते, असा मोदींचा सल्ला आहे? श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.