संजय राऊत यांचा बारामतीवर डोळा, म्हणतात ताकद वाढवली पाहिजे, पवारांचा गड भेदण्याची शिवसेनेची तयारी ?

पुण्यात बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना तसेच पक्षविस्ताराबद्दल सविस्तर भाष्य केलं. तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे असंदेखील त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.

संजय राऊत यांचा बारामतीवर डोळा, म्हणतात ताकद वाढवली पाहिजे, पवारांचा गड भेदण्याची शिवसेनेची तयारी ?
SHARAD PAWAR SANJAY RAUT
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 7:38 PM

पुणे : बारामती म्हटलं की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही दोन नावे आलीच. हा भाग राजकीय दृष्टीकोनातून पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याला भेदणं म्हणजे मोठं जिकरीचं काम असल्याचं म्हटलं जातं. पण हाच गड जिंकण्यासाठी तयारीला लागण्याची संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. बारामती हा माहाराष्ट्राचाच भाग आगे. आपण तिथे जिंकू शकतो. आपण सकारात्मक राहायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. (sanjay raut said shiv sena can win from baramati is trying to defeat sharad pawar and ajit pawar)

बारामती महाराष्ट्राचा भाग, संघटना वाढत राहिली पाहिजे

पुण्यात बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना तसेच पक्षविस्ताराबद्दल सविस्तर भाष्य केलं. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे असंदेखील त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. “बारामती आपली नाही, असं तुम्ही का गृहीत धरता. बारामतीही आपलीच आहे. बारामती महाराष्ट्राचा भाग आहे. संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही. पण संघटनेची ताकद वाढायला हवी. कधी वाटलं होतं का आपण पुरंदरला जिंकू ? हासुद्धा बारामतीचाच भाग आहे. आपण जिंकू शकतो. आपण जिंकू शकतो ही सकारात्मक भावना ठेवली पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना आग आहे, वाट्याला जाऊ नका

पक्षविस्ताराबद्दल बोलताना राऊत यांनी शिवसेना आग असल्याचं वक्तव्य केलं. “शिवसेना आग आहे शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना ही आग आहे. एकच सांगतो. उद्धव ठाकरे देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले आहेत. तसा पक्षही पहिल्या क्रमांकाचा व्हावा, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना संघटनेत स्थान द्या. कोणतंही पद न स्वीकारता बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधीश होते. मंत्री, आमदार, खासदार हे काही महत्त्वाचं नाही. पण पक्ष महत्त्वाचा आहे. मंत्रिपद येते आणि जाते. पण मग मला माजी म्हणू नका असं म्हणतात. आम्हाला कुणी माजी म्हणणार नाही,” असं राऊत म्हणाले.

अनेकांच्या भुवया उंचावल्या

दरम्यान, शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केलेली आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी अनेकवेळा एकला चलो रेची भाषा बोलून दाखवली आहे. पुण्यात बोलतानादेखील त्यांनी जमलं तर आघाडी होईल नाहीतर आपलं एकला चलो रे आहे असं म्हणत पहिल्यांदाच बारामती जिंकण्याची भाषा केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

इतर बातम्या :

शिवतारेंनी अजित पवारांना ललकारलं, राऊत म्हणाले, त्यांना भेटा, आम्ही तुमच्या पाठिशी!

युती, आघाडीत भांड्याला भांडं लागायला नको असेल तर 150 जागा निवडून आणा; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

(sanjay raut said shiv sena can win from baramati is trying to defeat sharad pawar and ajit pawar)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.