निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये : संजय राऊत

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आता थेट निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोग ही भाजपचीच एक शाखा असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये : संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 7:38 AM

मुंबई : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता थेट निवडणूक आयोगाला (Election Commission of India) लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोग (EC) ही भारतीय जनता पार्टीचीच (BJP) एक शाखा आहे. एक घटनात्मक प्राधिकरण असूनही निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut says Election Commission is branch of BJP so we cant expect anything better from them)

भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात राज्यात सत्ता दिल्यास कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून आपण अजून चांगली अपेक्षा करु शकत नाही.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीची एक शाखा आहे. यात आपण काय करु शकतो? दरम्यान बिहार निवडणुकीवर लक्ष असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाल्यास मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.

तेजस्वी यादव यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, या युवा नेत्याकडे कोणाचाही पाठिंबा नाही तसेच सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) सारख्या संस्था त्यांच्या मागे लागल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य तुरुंगात आहेत. तरीदेखील ते केंद्र सरकारला आव्हान देत आहेत. केंद्र सरकार विरोधी पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तरिही तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

फारुख अब्दुल्ला आणि महबुबा मुफ्तींवर राऊत संतापले

जम्मू आणि काश्मीरला कलम 370 पुन्हा बहाल करा अशी मागणी करणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि पीडीपी नेत्या महबुबा मुफ्ती यांच्यावरही राऊत यांनी टीका केली आहे.

राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का?; संजय राऊत म्हणतात…

‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे राऊतांना सॉल्लिड प्रत्युत्तर

अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही; राऊतांची सारवासारव

भाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून आहे; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

(Sanjay Raut says Election Commission is branch of BJP so we cant expect anything better from them)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.