संजय राऊत, नारायण राणे वाद विकोपाला, पाठवली मानहानीची नोटीस

राणे यांच्या वक्तव्याबद्दल संजय राऊत यांनी नोटीस पाठवली आहे. न्यायालयात राणे संजय राऊत यांच्या नोटीसला काय उत्तर देतात, ते पाहावे लागणार आहे.

संजय राऊत, नारायण राणे वाद विकोपाला, पाठवली मानहानीची नोटीस
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 9:45 AM

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोप असणारे हे प्रकरण न्यायालयात जाणार आहे. नारायण राणे यांनी १५ जानेवारी रोजी केलेल्या वक्तव्यावरुन ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राऊत यांना खासदार बनवण्यासाठी मी पैसे खर्च केले, असे नारायण राणे म्हणाले होते.  आता न्यायालयात नारायण राणे संजय राऊत यांच्या नोटीसला काय उत्तर देतात, ते पाहावे लागणार आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे

२००४ मध्ये संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी आम्ही पैसे खर्च केले. तसेच संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत नव्हते. राणे यांच्या या वक्तव्यांवर संजय राऊत यांनी नोटीस पाठवली आहे. याबाबत संजय राऊत यांचे म्हणणे आहे की, माझे मतदार यादीत नाव नव्हते हे नारायण राणे यांनी सिद्ध करून दाखवावे. तसेच राज्यसभेत निवडून आणण्यासाठी पैसे खर्च केलेत म्हणजे नेमकं काय केलंत ? असे पैसे खर्च खर्च करणे म्हणजे अँटिकरप्शन अंतर्गत हे प्रकरण येतं, असा दावा संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

आरोप सिद्ध करावे

संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे सर्व दावे खोडून काढले. ते म्हणाले, नारायण राणे म्हणतात, मी संजय राऊत यांना खासदार केले. मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कोण होते? मला खासदार शिवसेना प्रमुखांनी केले. नारायण राणे यांना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केले. आम्हाला सर्व पदे बाळासाहेबांनी दिले.  तसेच २००४ मध्ये माझे  नाव मतदार यादीत होते. माझे मतदार यादीत नाव नव्हते, हे ते खोटे बोलत आहे. मला आता त्याविषयी काय बोलायचे नाही. त्यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. शिवसेनेचे सर्वच नेते असे खटले दाखल करणार आहे.

वाद नेहमी रंगतो

संजय राऊत आणि नारायण राणे यांच्या वाद नेहमी रंगत असतो. ६ जानेवारी रोजी असा वाद रंगला होता. त्यावेळी राणे म्हणाले होते की, संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा तुरुंगात जाण्याचा मार्ग मी मोकळा करणार आहे. १०० दिवस जेलमध्ये जाऊन आला तर कमी वाटतायत.. मी २६ डिसेंबरचा तो अग्रलेख (Editorial) जपून ठेवलाय. मी वाचून विसरणारा नाही.लक्षात ठेवणारा आहे. वकिलांना ते पाठवून ठेवलंय. कारागृहात १०० दिवस राहिले हे ते विसरले, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊत यांना दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील कार्यक्रमात नारायण राणे यांनी राऊतांना इशारा दिला. त्यामुळे 26 डिसेंबरच्या त्या अग्रलेखात नेमकं काय होतं, त्याच्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय.

संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

राणे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांना चक्क पादरा पावट्याची उपमा दिली. राऊत म्हणाले होते की, तो पादरा माणूस आहे, आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही. नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख केला. हा सर्वांना अरे तुरे करतो, हा कोण आहे, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांना अरेतुरे करत होता, पंतप्रधान मोदींना अरेतुरे, हे कोण आहेत, याची चौकशी करा, असं संजय राऊत यांनी म्हटले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.